सोलापूर, 7 डिसेंबर : आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची मेहनत घेणाऱ्याला ध्येयवेडा असं म्हंटलं जातं. सोलापूरचा ललित स्वामीनंही लहाणपणी टीव्ही पाहाताना एक स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं अहोरात्र मेहनत घेतली. त्या कष्टातून त्यानं स्वत:चं स्वप्न पूर्ण केलंच त्याचबरोबर आता सोलापूरच्या अनेक तरुणांच्या स्वप्नांनाही तो बळ देत आहे.
कोण आहे ललित?
ललित सोलापूरच्या चाकोते नगर परिसरात राहतो. सिद्धेश्वर शाळेचा विद्यार्थी असलेल्या ललितनं डॉक्टर व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण, ललितला रिअॅलिटी शो मध्ये काहीतरी करुन दाखवण्याचं ललितचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो दहावीनंतरच मुंबईत गेला.
ललितनं मुंबईतील डान्स अकॅडमीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिफ होप,लॉकिंग ,पॅांपिंग, बी-बोईंग, क्रंपिंग या वेगवेगळ्या डान्स प्रकारचं त्यानं शिक्षण घेतलं. या कालखंडात त्यानं बराच संघर्ष केला, पण त्याची जिद्द कायम होती. या जिद्दीच्या जोरावरच त्यानं डान्सचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच अकॅडमीत ट्रेनर बनला.
Rolling Stone च्या प्ले लिस्टमध्ये झळकला सोलापूरचा 'गली बॉय', पाहा Video
शाहरुखसोबत डान्स!
ललितला 'डान्स प्लस सिझन फोर' या रिअॅलिटी शोमध्ये पहिल्यांदा ब्रेक मिळाला. रेमो डिसुझा, धर्मेश या गाजलेल्या कोरिओग्राफकडून तिथं तो शिकला. त्यांच्यासमोर त्याला डान्स करण्याची संधी मिळाली. 2020 मध्ये झालेल्या 'डान्स इंडिया डान्स' या आणखी एका मोठ्या रिअॅलिटी शोमध्ये त्यानं शेवटच्या आठ स्पर्धकांपर्यंत मजल मारली होती. इतकंच नाही तर सुपरस्टार शाहरुख खानसोबत फिल्मेफअर पुरस्कार कार्यक्रमातही ललितनं परफॉर्म केलं आहे. त्याचबरोबर चीनमधल्या डान्स स्पर्धेतही ललित सहभागी झाला आहे.
सोलापूरचं ऋण
सध्या 23 वर्षांचा असलेल्या ललितनं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. त्यानंतरही तो सोलापूरला विसरलेला नाही. सोलापूरच्या तरुणांना डान्समध्ये करिअर करण्यासाठी तो मदत करतोय. ललितनं आजवर 20 पेक्षा जास्त डान्स शिबिरांचं मोफत आयोजन केलं आहे. आता तो सोलापूरच्या डान्सरसाठी 'कॅम्प रिच' हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करणार असून त्यामध्ये अनेक प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर हजेरी लावणार असल्याचं ललितनं सांगितलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला लोकलमधील भजन गायक कोण आहे? पाहा Video
मला ललित सरांच्या क्लासमुळे अनेक डान्स प्रकार शिकायला मिळाले. यापूर्वी हे शिकण्यासाठी मुंबईला जावं लागत असे, आता तिकडं जाण्याची गरज नाही. सर्व प्रकारचं शिक्षण सोलापूरात उपलब्ध आहे, अशी प्रतिक्रिया ललितच्या क्लासमधील विद्यार्थिनी आरोहीनं दिलीय.
सोलापुरातील अनेक कलाकारांमध्ये नवं करण्याची क्षमता आहे. या कलाकारांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धेत सहभागी व्हावं, त्यामध्ये करिअर करावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला झालेला त्रास इतर कोणत्याही कलाकाराला होऊ नये, हाच माझा प्रामाणिक हेतू आहे, अशी भावना ललितनं व्यक्त केली.
ललितची आजवरची कामगिरी
- 2019 साली नावाजलेला डान्स प्लस सीजन फोरमध्ये सहभाग
- 2020 साली देशभरात नावाजलेल्या मुंबईतील किंग युनायटेड या डान्स क्लास चा तो प्रोफेशनल डान्स इन्स्ट्रक्टर बनला.
- डान्स इंडिया डान्स या रियालिटी शो साठी निवड, टॉप आठमध्ये धडक
- चीनमधील जगप्रसिद्ध डान्स अकॅडमी किंजाज येथे एक महिना प्रशिक्षण
- शाहरुख खान आणि विकी कौशल या मोठ्या अभिनेत्यांच्या फिल्मफेअर डान्स शो मध्ये बॅक डान्सर म्हणून
- आजवर अनेक कलाकारांना डान्स शोच्या ऑडिशनचं मोफत प्रशिक्षण
अधिक माहितीसाठी संपर्क - ललित स्वामी : +91 88881 36866
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Dancer, Local18, Shah Rukh Khan, Solapur