जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Rolling Stone च्या प्ले लिस्टमध्ये झळकला सोलापूरचा 'गली बॉय', पाहा Video

Rolling Stone च्या प्ले लिस्टमध्ये झळकला सोलापूरचा 'गली बॉय', पाहा Video

Rolling Stone च्या प्ले लिस्टमध्ये झळकला सोलापूरचा 'गली बॉय', पाहा Video

सोलापूरचा गली बॉय अशी ओळख असणारा आशुतोष आदमाने उर्फ (झी - झी मॅन) हा रॅपिंग या कलाप्रकाराला एक नवीन स्टॅंडर्ड देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

    सोलापूर 8 नोव्हेंबर :  2019 साली मुंबईतील एक मुलगा ज्याला संगीतातील रॅपिंग या क्षेत्रात आवड होती त्याच्यावर गली बॉय नावाचा चित्रपट आला. अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट यांची मुख्य भुमिका या चित्रपटात होती. संपूर्ण देशाला या चित्रपटाने रॅपिंग या कला प्रकाराची दखल घेण्यास भाग पाडले. त्यानंतर खऱ्या अर्थाने हळूहळू त्यावर रियालिटी येऊ लागले. जसा मुंबईत अंडरग्राउंड रॅपिंग हा प्रकार गाजला आहे. त्याच धर्तीवर सोलापुरात सुद्धा अंडरग्राउंड रॅपिंग बॅटल हा प्रकार रूढ होत चालला आहे. त्यातच सोलापूर चा गली बॉय अशी ओळख असणारा आशुतोष आदमाने उर्फ (झी - झी मॅन) हा रॅपिंग या कलाप्रकाराला एक नवीन स्टॅंडर्ड देण्यासाठी प्रयत्न करत आहे. चला तर मग सोलापूरचा गली बॉय अशी ओळख असणारा आशुतोष आदमाने बद्दल जाणून घेऊया. अशी झाली रॅपिंगला सुरुवात  आशुतोष आदमाने याने शालेय शिक्षण हरिभाई देवकरण शाळेत पूर्ण केले. बालपण मागे टाकत मोठं होत असताना जसे अनेक किशोरवयीन मुले संगीताकडे वळतात तसेच आशुतोषने देखील पाश्चिमात्य गाणी ऐकण्यास सुरुवात केली. ही सुरुवात हळू हळू त्याची आवडीमध्ये बदलत गेली. जगप्रसिद्ध रॅपर एमिनेमची गाणी, दिवंगत लेजंडरी रॅपर दी नोटोरीयस बी.आय.जी. ची गाणी जेव्हा आशुतोषच्या कानी आले तेव्हा त्याची ओळख झाली. ती हिप-हॉप कल्चर शी आणि येथूनच आशुतोषचा (झी - झी मॅन)  बनण्याचा प्रवास सुरू झाला.

    News18लोकमत
    News18लोकमत

    सोशल मीडियावर व्हायरल झालेला लोकलमधील भजन गायक कोण आहे? पाहा Video रॅप करण्यासाठी बीट्स कसे वापरतात याचे त्याने सतत निरीक्षण केले. ह्यातून (झी - झी मॅन) घडत गेला. लिहिण्याची सुरुवात इंग्रजी मध्ये केली. पुढे भाषेचे बांध तोडत हिंदी आणि मराठी मध्ये देखील आपल्या शब्दांची जादू रॅपच्या रुपात मांडू लागला. आज आशुतोषचे यूट्यूबवर हजारो दर्शक आहेत. आपल्या विविध प्रकारच्या रॅपमधून , संगितामधून अनेक लोकांपर्यंत तो पोहचलेला आहे. अनेकांच्या चेहऱ्यावरचं हास्य बनून त्याचे गाणे वाह-वाही लुटत आहेत. रॅप करतानाची त्याची प्रचंड ऊर्जा व उत्साह हे त्याचे वैशिष्ट्य आहे. अमेरिकेतही दखल आशुतोष आदमानेचे गाणं रोलिंग स्टोन ह्या अमेरिकन मासिकाच्या भारतीय सोशल हॅण्डलवर रिलीज झालेले अनफोल्ड हे गाणं प्रदर्शित करण्यात आलेलं आहे. या सोबतच इल्ज़ाम,  MH13 का एक लड़का , बापाची चप्पल हे सुद्धा त्याची गाणी प्रकाशित आहेत. सोलापूर शहरात राहून त्याला 20 वर्षे झाली आणि ह्या कलेमार्फत जगभरातील लोकांपर्यंत सोलापूरला पोहचवण्याची  त्याची इच्छा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेली डान्सर गौतमी पाटील कोण आहे? पाहा Inside Story संगीतातला हा प्रकार नक्कीच आणखी वाढला पाहिजे. परंतु प्रत्यक्षात आपण जे गातो किंवा जे लिहितो ते वास्तवात जगलं पाहिजे. तरच आपल्या प्रामाणिकपणातून आपले करिअर यात सेट होऊ शकते. मुळात जो कोणी सोलापूरकर या कलेत येण्यासाठी इच्छुक आहे, त्यांच्यासाठी माझे मार्गदर्शन आणि साथ ही कायमच त्यांच्यासोबत राहील, असं आशुतोष सांगतो. रॅपिंग म्हणजे काय?

     रॅपिंग (रॅपिंग,एमसीइंग किंवा एमसीईंग) हा स्वर वितरणाचा एक संगीत प्रकार आहे. ज्यामध्ये “यमक, लयबद्ध भाषण आणि रस्त्यावरील स्थानिक भाषा” समाविष्ट आहे, जे सादर केले जाते किंवा मंत्रोच्चार, सहसा बॅकिंग बीटवर किंवा संगीताच्या साथीवर. रॅपच्या घटकांमध्ये “सामग्री " (काय बोलले जात आहे), “प्रवाह " (लय, यमक), आणि “वितरण” (लहरी, स्वर) यांचा समावेश होतो. रॅप हे बोलल्या जाणार्‍या कवितेपेक्षा वेगळे आहे कारण ते सहसा संगीताच्या साथीला ऑफ-टाइम केले जाते. रॅप हा हिप हॉप संगीताचा एक प्राथमिक घटक आहे जो सामान्यतः त्या शैलीशी संबंधित आहे.

    संपर्क क्रमांक

    आशुतोष आदमाने - +91-7720995064 YouTube channel name - ZZ MAN

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात