जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Viral Video Policeman : सोलापूरातील पोलीस कर्मचाऱ्याचा काम सोडून भरचौकात मनसोक्त डान्स, VIRAL VIDEO ने खळबळ

Viral Video Policeman : सोलापूरातील पोलीस कर्मचाऱ्याचा काम सोडून भरचौकात मनसोक्त डान्स, VIRAL VIDEO ने खळबळ

Viral Video Policeman : सोलापूरातील पोलीस कर्मचाऱ्याचा काम सोडून भरचौकात मनसोक्त डान्स, VIRAL VIDEO ने खळबळ

सोलापूर शहरात पोलीस कॉन्स्टेबलचा डान्स करतानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे. याची जोरदार चर्चा रंगली आहे.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

प्रितम पंडित (सोलापूर), 25 डिसेंबर : सोलापूर शहरात पोलीस कर्मचाऱ्याचा डान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. गंगामाई हॉस्पिटल समोर एका पोलीस कॉन्स्टेबलचा डान्स करतानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे. सदर पोलीस कर्मचाऱ्याचे राजेश पवार असे नाव आहे. मंगळवेढा पोलीस ठाण्यात कर्मचारी म्हणून काम करतो. सोलापुरातील रहदारी असणाऱ्या रस्त्यावर राजेश पवार यांनी मनसोक्त डान्स केला.

जाहिरात

रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसमोर पोलीस कर्मचारी अशा प्रकारे डान्स करत असल्याचे पाहुन नागरिकांना आश्चर्य वाटले. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याच्या डान्सचा व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला. शहराची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे तेच अशा पद्धतीने वागत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे पहायचे असा प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे.

हे ही वाचा :  शरीर संबंधांस नकार दिल्याने विद्यार्थिनीला केलं परीक्षेत नापास; प्रोफेसरला अटक

नागरिकांनी सोलापूर शहर पोलीस दलाला माहिती दिली. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गंगामाई हॉस्पिटल येथे येऊन सदर पोलीस कर्मचाऱ्यास ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात घेऊन आले. पीएसआय डोंगरे यांनी डान्स करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला घेऊन गेले.

जाहिरात

सांगलीतही धक्कादायक प्रकार समोर

सांगली  शहरातून महागड्या आणि नामवंत कंपन्यांच्या सायकली चोरणाऱ्या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून 1 लाख 23 हजारांच्या तब्बल 20 सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. वरुण रमेश पांढरे असे आरोपीचे नाव आहे. केवळ चैनीसाठी या चोऱ्या केल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  Sangli : बंगल्यातील सर्वांचे हातपाय बांधून घातला दरोडा! शस्त्राचा धाक दाखवून लूट

सांगली शहरातील विविध परिसरातून महागड्या सायकल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. यात प्रामुख्याने ब्रँडेड सायकली चोरीला जात होत्या. चोरट्यास पकडण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली तरी तो चोरटा पोलिसांच्या हाताला लागत नव्हता. पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांना एक तरुण नवीन सायकल विक्री करण्यासाठी कॉलेज कॉर्नर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा लावला असता एकजण सायकल घेऊन परिसरात थांबल्याचे निदर्शनास आले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात