जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli : बंगल्यातील सर्वांचे हातपाय बांधून घातला दरोडा, शस्त्राचा धाक दाखवून केली मोठी लूट

Sangli : बंगल्यातील सर्वांचे हातपाय बांधून घातला दरोडा, शस्त्राचा धाक दाखवून केली मोठी लूट

Sangli : बंगल्यातील सर्वांचे हातपाय बांधून घातला दरोडा, शस्त्राचा धाक दाखवून केली मोठी लूट

सांगली शहरात मध्यरात्री बंगल्यातील लोकांचे हातपाय बांधून दरोडा टाकण्यात आला. यामध्ये चोरट्यांनी मोठी रक्कम लुटली आहे.

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

    सांगली, 23 डिसेंबर : सांगली शहरातील कर्नाळ रोड येथील दत्तनगर मध्ये आशिष चिंचवाडे यांच्या बंगल्यात धाडसी चोरी करण्यात आली आहे. यामध्ये बंगल्याचे मालक आशिष चिंचवाडे यांचे हातपाय बांधून त्यांच्या आईच्या गळ्यातील सव्वा आठ तोळे सोन्याचे दागिने आणि कपाटामधील 100 ग्रॅम चांदी आणि दोन लाखाची रोकड असा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला आहे . काय आहे प्रकरण? कर्नाळा रोडवरील झेंडा चौक येथील बंगल्यात चिंचवाडे कुटुंबीय राहतात. गुरुवारी रात्री नेहमी प्रमाणे चिंचवाडे कुटुंबीय जेवण करून झोपले होते. पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सहा दरोडेखोरांच्या टोळीने त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. मोठा आवाज आल्याने चिंचवाडे झोपेतून उठले. यावेळी सहा दरोडेखोरांनी आशिष यांचे हातपाय बांधले आणि त्यांच्या आईंना स्टीलचा रॉड आणि लोखंडी कटरसह हत्यारांनी मारण्याची धमकी देऊन त्यांच्या जवळ असणारे दागिने आणि रोख रक्कम दोन लाख रुपये काढून घेतली. यामध्ये एक लाख रुपये किमतीचे पाच तोळे वजनाच्या पाटल्या, 40 हजार रुपये किंमतीची 21 ग्रॅमची सोन्याचे चेन, 5 ग्रॅम वजनाच्या दहा हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, 5 हजार रुपये किमतीचे चांदीचे 100 ग्रॅम वजनाचे पैंजण, करदोडा, छल्ला, निरांजन, 8 हजारांचे 8 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, 20 हजारांचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स यांचा समावेश आहे. अर्ध्या रात्री एकत्र आल्या 8 महिला, वृद्धाला रस्त्यावर घेरून चाकूने भोसकलं दरोडेखोरांनी सर्व मुद्देमाल लुटल्यानंतर चिंचवाडे यांचे मोबाईल फोन काढून घेतले आणि घरातून पलायन केले. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी ते मोबाईल फोन घराबाहेर असणाऱ्या झुडपांमध्ये टाकून दिले. अचानक घडलेल्या घटनेनं चिंचवाडे कुटुंबीय भयभीत झाले होते. यानंतर आशिष यांनी सांगली शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. अधीक्षकांनी सर्व घटनाक्रम जाणून घेत तपासाच्या सूचना दिल्या आहेत. प्रेमातून हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढायची नंतर लाखोंना फसवायची, कोण आहे ही बेगम? या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली आहे . या चोरीनंतर सांगली शहर पोलिसांनी तीन पथक रवाना केली असून त्या पथकाद्वारे चोट्यांचा माग काढला जात आहे . घटनास्थळी पोलीस अधीक्षक बसवराज तेली , उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली आहे त्याच पद्धतीने या चोरीचा तपास जलद गतीने करण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षकांनी शहर पोलिसांना दिल्या आहेत

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात