जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / शरीर संबंधांस नकार दिल्याने विद्यार्थिनीला केलं परीक्षेत नापास; प्रोफेसरला अटक

शरीर संबंधांस नकार दिल्याने विद्यार्थिनीला केलं परीक्षेत नापास; प्रोफेसरला अटक

शरीर संबंधांस नकार दिल्याने विद्यार्थिनीला केलं परीक्षेत नापास; प्रोफेसरला अटक

शरीर संबंधांस नकार दिल्याने विद्यार्थिनीला केलं परीक्षेत नापास; प्रोफेसरला अटक

राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये (आरटीयू) नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी पोलिसांनी प्रोफेसर गिरीश परमारला अटक केली आहे.

  • -MIN READ Trending Desk New Delhi,New Delhi,Delhi
  • Last Updated :

कोटा, 23 डिसेंबर : राजस्थानमधील कोटा इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय, त्यामुळे तिथलं वातावरण चांगलंच तापलंय. राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये (आरटीयू) नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी पोलिसांनी प्रोफेसर गिरीश परमारला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एक विद्यार्थी अर्पित अग्रवाल यालाही अटक करण्यात आली आहे. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय.

जाहिरात

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित युवती विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहते. आरोपी प्रोफेसर गिरीश परमार याने पीडितेचा क्लासमेट अर्पित अग्रवाल याच्यामार्फत तिला शारीरिक संबंधांच्या बदल्यात परीक्षेत पास करण्याची ऑफर दिली होती. पीडितेने यासाठी नकार दिल्यावर त्याने तिला अंतिम वर्षाच्या परीक्षेत नापास केलं आणि नंतर त्याची ऑफर स्वीकारण्यासाठी तिच्यावर अनेक वेळा दबाव टाकला. प्रोफेसरने इतर विद्यार्थिनींशीही असंच वर्तन केलं, ब्लॅकमेल करून त्यांचा छळ केला, असा आरोप पीडितेने केला आहे.

हे ही वाचा :  पतीचा खरा चेहरा समोर आला अन् रस्त्यावरच हाय व्होल्टेज ड्रामा झाला, पत्नीने धुलाई करत कॉलर पकडली अन्…

वकिलाने प्रोफेसरच्या कानशिलात लगावली

पीडितेच्या तक्रारीवरून दादावाडी पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा आरोपी प्रोफेसर आणि मध्यस्थ असलेल्या विद्यार्थ्याला अटक केली. दोघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर केलं जात असताना एका वकिलाने आरोपी प्राध्यापकाच्या कानशिलात लगावली.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका वकिलाने आरोपी प्रोफेसरला कोर्टात जात असताना थप्पड मारली. पण त्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टरूममधून बाहेर काढलं. आतिश सक्सेना असं या वकिलाचं नाव आहे. दरम्यान, डीएसपी अमर सिंह यांनी हल्ल्याचं वृत्त फेटाळत काही वकिलांनी केवळ निषेध केला आणि आरोपींच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचं सांगितलं.

जाहिरात

कुलगुरू एस. के. सिंह यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न

दुसरीकडे, या प्रकरणावरून आरटीयू कॅम्पसमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातर खडाजंगी झाली. प्रत्यक्षात विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही मॅनेजमेंटविरोधात कुलगुरू कार्यालयाबाहेर निदर्शनं केली. आंदोलकांपैकी एकाने कुलगुरू एस. के. सिंह यांनाही मारहाण केली आणि त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. नंतर आंदोलक दुसऱ्या कॉलेजचा विद्यार्थी असल्याची ओळख पटली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यातही घेतलं आहे.

जाहिरात

आरोपी प्रोफेसर निलंबित

हे प्रकरण समोर येताच प्रोफेसर शिक्षक आणि विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी अहवालाच्या आधारे कठोर कारवाई केली जाईल. रजिस्ट्रार फरलाद मीणा यांच्या आदेशानुसार विद्यापीठ व्यवस्थापनाने आरोपी प्रोफेसरला या पूर्वीच निलंबित केलंय, असं विद्यापीठाचे कुलगुरू सिंह म्हणाले.

दरम्यान, कोटा (शहर) एसपी केसर सिंह शेखावत यांनी आरोपी प्रोफेसरवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय. तसंच विद्यार्थ्यांनी अशा प्रकरणांची पोलिसांकडे तक्रार करण्याचं आवाहन केलंय.

जाहिरात

मंगळवारी दादावाडी पोलीस ठाण्यात प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भादंवि कलम 354 डी आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर, आयटी कायद्याची कलमं 67 आणि आयपीसीची कलम 354 (ए) आणि 384 देखील या प्रकरणात लावण्यात आली आहेत. दोघांवरही एससी-एसटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपाससिंग यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

जाहिरात

दरम्यान, पीडितेने कलम 164 (कबुलीजबाब आणि जबाब नोंदवणे) अंतर्गत मॅजिस्ट्रेटसमोर तिचा जबाब नोंदवला. असाच प्रकार इतरांबरोबरही घडलाय का, हे शोधण्यासाठी इतरांचे जबाब नोंदवले जातील, असंही डीएसपी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात