मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेतकऱ्यांच्या पाण्याची चिंता झटपट मिटणार, 'या' सरकारी योजनेचा घ्या फायदा!

शेतकऱ्यांच्या पाण्याची चिंता झटपट मिटणार, 'या' सरकारी योजनेचा घ्या फायदा!

 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेता येईल.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेता येईल.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेता येईल.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Solapur, India

  सोलापूर, 28 जानेवारी : सोलापूर आणि जिल्ह्यातील जवळपास 80 टक्के भाग हा कमी पर्जन्याचा भाग आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती करिता वरदान ठरणाऱ्या पाणलोट आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढवणे ही काळाची गरज ठरली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेता येईल. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असं आवाहन सोलापूर तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले आहे. 

   शेततळ्यासाठी असे मिळेल अनुदान

  - पंधरा बाय पंधरा बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 18 हजार 621 20 हजार 235 रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 14 हजार 433 आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 15 हजार 717 रुपये एवढे अनुदान आहे.

   -वीस बाय पंधरा बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 26 हजार 774 29 हजार 46 रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 21 हजार 539 आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 23 हजार 399 रुपये एवढे अनुदान आहे.

   -वीस बाय वीस बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 38 हजार 417 41 हजार 623 रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 32 हजार 135 आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 34 हजार 846 रुपये एवढे अनुदान आहे.

  फळबाग लागवडीसाठी घ्या सरकारी योजनेचा फायदा, लगेच भरा अर्ज

   -पंचवीस बाय वीस बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 50 हजार 61 54 हजार 199 रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 42 हजार 731 आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 46 हजार 293 रुपये एवढे अनुदान आहे.

   -पंचवीस बाय पंचवीस बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 65 हजार 194 70 हजार 740 रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 56 हजार 818 आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 61 हजार 505 रुपये एवढे अनुदान आहे.

   -तीस बाय पंचवीस बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 75 हजार  75 हजार रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 70 हजार 904 आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 75 हजार रुपये एवढे अनुदान आहे.

   -वीस बाय वीस बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 38 हजार 417 41 हजार 623 रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 32 हजार 135 आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 34 हजार 846 रुपये एवढे अनुदान आहे.

   -तीस बाय तीस बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 75 हजार  75 हजार रुपये इतके अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 75 हजार  आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 75 हजार एवढे अनुदान आहे.

   -चौतीस बाय चौतीस बाय तीन आकारमानासाठी उतारा बाजूस सर्वसाधारण क्षेत्र आणि आदिवासी डोंगराळ क्षेत्रात अनुक्रमे 75 हजार अनुदान आहे तर काळ्या मातीसाठी सर्वसाधारण क्षेत्रास 75 हजार  आदिवासी डोंगराळ क्षेत्रात 75 हजार एवढे अनुदान आहे.

  Wheat Export : सोलापूर जिल्ह्यातल्या गव्हाची देखील होऊ शकते जगभर निर्यात! पाहा Video

  कोरडवाहू शेती करिता वरदान ठरणाऱ्या या शेततळ्याच्या संदर्भातील योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच शासनाच्या अधिकृत महा डीबीडी या पोर्टलवर अर्ज करावेत जर कोणत्या शेतकऱ्याला या संदर्भात अडचण आली तर स्थानिक कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि आपले अर्ज पूर्ण करावेत, असंही मिसाळ यांनी सांगितले. 

  First published:

  Tags: Agriculture, Farmer, Local18, Solapur