मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /फळबाग लागवडीसाठी घ्या सरकारी योजनेचा फायदा, लगेच भरा अर्ज

फळबाग लागवडीसाठी घ्या सरकारी योजनेचा फायदा, लगेच भरा अर्ज

Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme या योजनेच्या अंतर्गत एकूण सोळा बहुवार्षिक फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme या योजनेच्या अंतर्गत एकूण सोळा बहुवार्षिक फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme या योजनेच्या अंतर्गत एकूण सोळा बहुवार्षिक फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

    सोलापूर, 27 जानेवारी : महात्मा गांधी रोजगार हमी योजनाअंतर्गत लाभ घेता येऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संधी मिळावी यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत एकूण सोळा बहुवार्षिक फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार किंवा कृषी हवामान क्षेत्रास अनुकूल असलेल्या फळपिकांच्या कलमांची अथवा रोपांची कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या वाणाची लागवड करण्याची मुभा देण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत किमान 0.80 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत क्षेत्र मर्यादा असणे गरजेचे आहे, अशी माहिती सोलापूर तालुका कृषि अधिकारी मनिषा मिसाळ यांनी दिली आहे.

    या फळपिकांचा लाभ घेता येणार 

    - आंबा कलमी हे फळपीक असेल तर दहा बाय दहा अंतर मीटरमध्ये 100 झाडांकरिता आणि त्यासाठी 65 हजार 84 रुपये इतके अनुदान मिळेल

    आंबा कलमी (सधन लागवड) पाच बाय पाच अंतरावर 400 झाडांकरिता 1 लाख 26 हजार 144 रुपये अनुदान मिळेल.

    - पेरू कलमी आणि सदन लागवड पेरू कलमे यांसाठी सहा बाय सहा आणि तीन बाय दोन या अंतर मीटरवर 277 आणि 1666 या झाडांच्या संख्या करिता अनुक्रमे 73 हजार 319 व 2 लाख 23 हजार 811 रुपये इतके अनुक्रमे अनुदान मिळेल.

    -डाळिंब कलमी याकरिता चार बाय तीन अंतर मीटरसाठी 740 झाडांकरिता 1 लाख 17 हजार 615 रुपये इतके अनुदान मिळेल.

    -कागदी लिंबू कलमी सहा बाय सहा अंतर मीटर असणाऱ्या 277 झाडांकरिता 81 हजार 383 रुपये अनुदान मिळेल.

    -सिताफळ कलमी पाच बाय पाच मीटर अंतरावरील 400 झाडांकरिता 86 हजार 762 रुपये अनुदान मिळेल.

    -नारळ रोपांकरिता आठ बाय आठ मीटर अंतरावर 150 झाडांकरिता 52 हजार 32 रुपये अनुदान मिळेल.

    Wheat Export : सोलापूर जिल्ह्यातल्या गव्हाची देखील होऊ शकते जगभर निर्यात! पाहा Video

    महाडीटीबी पोर्टल या संकेतस्थळावरून अर्ज करावेत 

    याव्यतिरिक्त मोसंबीकाजूसंत्राजांभूळचिंचआवळाचिकू इत्यादी फळपिकांकरिता सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे. शासनाद्वारे खड्डे खोदणे कलमे किंवा रोपांची लागवड करणे पिक संरक्षण ठिबक द्वारे पाणी देणे याकरिता सुद्धा अनुदान रक्कम देण्यात येतेइच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाडीटीबी पोर्टल या संकेतस्थळावरून अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडल कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले आहे .

    First published:

    Tags: Agriculture, Farmer, Local18, Solapur