सोलापूर, 3 नोव्हेंबर : मुंबई-पुण्यातील खवय्यांना बार्बेक्यू ही संकल्पना चांगलीच माहिती आहे. सोलापुरात बार्बेक्यू सुरू झाले नव्हते. त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. सोलापूरमध्ये अस्सल देसी संकल्पनेतून 'बार्बेक्यू छत पे' हे रेस्टॉरंट सुरू झाले आहे. हे हॉटेल जगप्रसिद्ध बार्बेक्यू हॉटेलच्या साखळीतील आणखी एक हॉटेल नाही. तर खास सोलापुरी स्टाईलनं हे हॉटेल सुरू करण्यात आले असून त्याची शहरात जोरदार चर्चा आहे.
काय आहे वेगळेपण?
या रेस्टॉरंटमधील मेन्यू हे सोलापूरकरांच्या आवडीचा विचार करुन बनण्यात आले आहेत. यातील सर्व पदार्थांमध्ये सोलापुरी चटणीचा वापर करण्यात आला आहे. सध्या एका व्यक्तीला व्हेज मेन्यूसाठी 699 तर नॉनव्हेज मेनूसाठी 799 रुपये असा दर आहे. यामध्ये स्टार्टर्स, मेन कोर्स आणि अनलिमिटेड डेझर्ट अशी विभागणी करण्यात आली आहे.
या रेस्टॉरंची विभागणी देखील तीन भागांमध्ये केली आहे. ज्यांना फक्त बिर्याणी हवी असेल त्यांच्यासाठी बिर्याणी हाऊस आहे. फास्ट फुड आणि सॉफ्ट ड्रिंकसाठी पुराणी गल्ली हा विभाग आहे. तर बार्बेक्यू टेस्ट करण्यासाठी 'बार्बेक्यू छत पे' हा स्वतंत्र विभाग आहे.
... म्हणून पुण्यातील कॅफेनं सुरू केले 13 प्रकारचे वेगन आईस्क्रीम, पाहा Video
कशी सुचली कल्पना?
'मी गेली दहा वर्ष या हॉटेल व्यवसायात कार्यरत आहे. सोलापूरकरांसाठी काहीतरी नावे करावे जेणेकरून खवय्यांची हाऊस पूर्ण होईल या संकल्पनेतून मी बार्बेक्यू छत पे नावाने नवीन रेस्टो सुरू केले आहे. सोलापूर स्टाईलने सर्व मसाले वापरून प्रत्येक डिश येथे बनवली आहे,' असे या रेस्टॉरंटचे मालक रमेश फतेवाले यांनी सांगितले.
काय आहे मेन्यू?
व्हेज पदार्थांमध्ये पनीर तेरीयाकी ब्रिक, पनीर मखमली टिक्का, दही के शो, बेस्ट मशरूम कस्टर्ड, आलू अनार टिक्की, कोरिअंडर ग्रील्ड, मेरिकन चीज पोटॅटो या पदार्थांचा पर्याय आहे.
Solapur : झोपडीतील चिवडा बनला मोठा ब्रँड, पाहा इंटरेस्टींग कहाणी Video
तर नॉनव्हेज स्टार्टर्समध्ये चिकन तेरीयाकी, जो जो चिकन ,कलमी ड्रमस्टिक्स ,मटन शीख कबाब ,फिश टिक्का ,स्मोकड चिकन हे प्रमुख पदार्थ ट्राय करता येतील.
गुगल मॅपवरून साभार
कुठे आहे सोलापुरी बार्बेक्यू ?
'द बार्बेक्यू रुम', 27 सिव्हिल लाईन्स, गांधी नगर चौक, हेरिटेज गार्डन जवळ, सोलापूर. 413003
अधिक माहितीसाठी संपर्क - रमेश फतेवाले - 8956240863
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Local18, Local18 food, Solapur