जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Solapur : झोपडीतील चिवडा बनला मोठा ब्रँड, पाहा इंटरेस्टींग कहाणी Video

Solapur : झोपडीतील चिवडा बनला मोठा ब्रँड, पाहा इंटरेस्टींग कहाणी Video

Solapur : झोपडीतील चिवडा बनला मोठा ब्रँड, पाहा इंटरेस्टींग कहाणी Video

सोलापूर आणि महाराष्ट्रासह जगभर लोकप्रिय असलेल्या लांबोटी मक्याच्या चिवड्याची सुरूवात कशी झाली होती जाणून घ्या.

  • -MIN READ Solapur,Solapur,Maharashtra
  • Last Updated :

    सोलापूर, 29 ऑक्टोबर : देशात ज्वारीचे कोठार,चादरीचे गाव आणि देश स्वतंत्र व्हायच्या आधी तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगलेले गाव म्हणून सोलापूरची ओळख आहे. परंतु त्याच्यापेक्षाही पलीकडे जाऊन खाद्य संस्कृतीसाठी सोलापूर हे राज्यात तसेच देशात प्रसिद्ध आहे. शेंगाची चटणी आणि कडक भाकर ही तर सोलापूरची साऱ्या जगभरात गेली आहे. त्याचबरोबर लांबोटी मक्याचा चिवडा हा सोलापूर मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भुरळ घालतो. चला तर मग या चिवड्याची सुरुवात कशी झाली? या चिवड्याची वैशिष्ट्ये काय आहेत जाणून घेऊया. सोलापुरातून पुणे हायवे लगत 22 किलोमीटरवर लांबोटी नावाचे गाव आहे. तेथील चिवडा हा देशभरात लांबोटीचा चिवडा म्हणून ओळखला जातो. देशात आणि विदेशात कुठेही हा चिवडा आपल्याला घरबसल्या मिळण्याची सोय हॉटेल जयशंकरचे मालक खताळ बंधू यांनी केली आहे. त्याचबरोबर शेंगाची चटणी आणि इतर पॅकिंग फूड मटेरियल आज ते संपूर्ण देशभरात पोहोचवत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कारळ चटणी ,जवस चटणी, शेंगाची चटणी लोणच्यातले सर्व प्रकार आणि शुद्ध खव्यापासून बनलेले सर्व मिठाईचे प्रकार यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

    हेही वाचा : Pune : झणझणीत मिसळीचा रंग तांबडा नाही तर हिरवा, पाहा VIDEO

    अशी झाली चिवड्याची सुरुवात

    1972 साली रुक्मिणी बाई खताळ व त्यांचे पती शंकर खताळ हे आपले राहते गाव सोडून सोलापूर उस्मानाबाद हायवेच्या बाजूने सरकारने सुरू केलेल्या दुष्काळ रोजगार हमी योजनेत काम करू लागले. रुक्मिणी खताळ यांनी आपला प्रपंच नेटका व्हावा यासाठी झोपडीत तीन दगडांची चूल मांडत चहाचा व्यवसाय चालू केला आणि हायवेवर थांबणाऱ्या ट्रक आणि मजुरांना तो चहा विकून आपला आर्थिक प्रपंच चालवू लागल्या. त्यातून कामगारांना चहासोबत आपण मक्याचा चिवडा दिला पाहिजे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. हळूहळू त्यांच्या या पदार्थाला मागणी इतकी इतकी झाली की त्यांनी जयशंकर नावाने आपले हॉटेल सुरु केले आणि त्यानंतर या चिवड्याला देशातून नव्हे तर विदेशातूनही मागणी होवू लागली.

    कसा बनवला जातो हा चिवडा  -प्रथमतः मका पूर्णपणे भाजून घेतला जातो. - हलक्या दमावर थोडा टनक होईपर्यंत मका भाजून घेतला जातो. -त्यानंतर एका भांड्यामध्ये दाळे शेंगा या संपूर्णपणे नीट केल्या जातात. -एक वाटी शेंगदाणे ,एक वाटी दाळे आणि कढीपत्ता घेऊन धन्याची व्यवस्थित पूड करून घेतले जाते. त्यानंतर मिक्सरमध्ये मीठ आणि साखर बारीक केली जाते. -त्यानंतर गरम तेलामध्ये धन्याची पावडर आणि हिंग घालून भाजून घेतले जाते. -त्यानंतर क्षमतेनुसार तीळ घालून व्यवस्थित भाजून घेतले जाते. -आणि तयार झालेले मिश्रण हे मक्याच्या चिवड्यावर टाकून डाळी आणि शेंगा व्यवस्थित मिक्स करून घेतले जाते. काय आहेत या चिवड्याची वैशिष्ट्ये  -मक्याला स्वतःची विशिष्ट अशी चव असल्याने मका मंद आचेवर भाजून घेतल्याने खमंग अशी चव त्याला प्राप्त होते. -त्याचबरोबर धने पावडर आणि इतर मसाल्यांमुळे त्याला तिखट आणि गोड अशी दोन्हीही चव प्राप्त होते. -त्याचप्रमाणे कढीपत्त्याची फोडणी मारून त्याच्यातील खमंगपणा आणखीच वाढवला जातो. -झटपट बनणारा म्हणून हा चिवडा ओळखला जातो. -तसेच त्याची चव त्याच्या खमंगपणामुळे जिभेवर रेंगाळते. हेही वाचा :  हातगाड्यावर सुरूवात झालेला ‘लक्ष्मीनारायण चिवडा’ कसा बनला जागतिक ब्रँड? पाहा Video आजीच्या निधनानंतर हा उभा केलेला उद्योग व्यवस्थित चालावा यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. तसेच परंपरागत चालत आलेल्या या व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड मिळावी या अनुषंगाने आम्ही आमच्या हॉटेलच्या नावाची वेबसाईट डेव्हलप केली आहे. सध्या राज्यात, देशात, आणि विदेशात व्हॉट्सॲप द्वारे आम्ही चिवडा पार्सल करण्याचे ऑर्डर घेत आहोत आणि  ग्राहकांसाठी चिवडा उपलब्ध करून देत आहोत,अशी माहिती हॉटेल जयशंकरचे मालक रुद्राक्ष खताळ यांनी दिली. कुठे आहे हॉटेल जयशंकर? सोलापुरातून पुणे हायवे लगत 22 किलोमीटरवर लांबोटी नावाचे गाव आहे. या ठकाणी हॉटेल जयशंकर आहे. अधिक माहितीसाठी 77559 85999 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: food , solapur
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात