सोलापूर,13 ऑक्टोबर : सध्या माती पासून बनवलेल्या विविध वस्तूंची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सजावटीसाठी फ्लावर पॉट किंवा घरगुती स्वयंपाक घरात मातीची भांडी वापरण्यांकडे लोकांचा कल वाढला आहे. लोकांचा वाढलेला कल लक्षात घेता सोलापूर शहरातील परंपरागत कुंभार व्यावसायिक शंकर कुंभार माती पासून विविध कलाकृती साकारत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पाण्याचे छोटे जार, पिण्याच्या पाण्याचे ग्लास, आणि इतर शोभेच्या वस्तू ते या मातीपासून बनवत असतात. यासोबतच त्यांनी आता प्रवासासाठी कॅरी करण्यात येणाऱ्या पाण्याच्या माती पासून इको फ्रेंडली बॉटल्स बनवायला सुरुवात केली असून कर्नाटक ,केरळ, तामिळनाडू ,आंध्र प्रदेश, छत्तीसगड मध्य प्रदेश आदी राज्यांसह महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात या इको फ्रेंडली बॉटल्सला मागणी होत आहे. त्यांनी बनवलेल्या या इको फ्रेंडली बॉटल्सची किंमत दीडशे रुपये पासून 280 रुपयांपर्यंत आहे. हेही वाचा : Success Story : लाकडातून साकारल्या भन्नाट कलाकृती, विदेशातही होतेय दमदार विक्री, Video बाटली पूर्णपणे तयार होण्यासाठी 12 ते 15 दिवस इतका कालावधी आंध्र प्रदेशातून आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या इतर छोट्या मोठ्या गावातून इको फ्रेंडली बॉटल्स बनवण्यासाठी आम्ही विशिष्ट प्रकारची माती मागवतो. एका बाटलीला आकार देण्यासाठी साधारणपणे सात ते आठ मिनिट इतका वेळ लागतो. बाटली पूर्णपणे तयार होण्यासाठी 12 ते 15 दिवस इतका कालावधी लागतो, असं व्यावसायिक शंकर कुंभार सांगतात.
इको फ्रेंडली बॉटल्स मधील पाणी पिण्याचे फायदे 1) मातीने बनवलेल्या बाटलीतून पाणी पिल्याने टॉन्सिल्स, सर्दी यासारख्या समस्या होणार नाहीत. फ्रिजचे थंड पाणी पिल्याने घसा दुखू शकतो. पण हे पाणी पिल्याने दुखणार नाही व गळ्याला आराम मिळेल. 2) उष्माघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी मातीने बनवलेल्या बाटलीतून पाणी पिणे फायद्याचे ठरते. शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. शरीराला जीवनसत्त्वे मिळतात. 3) हे पाणी पोटाची उष्णता नैसर्गिक पद्धतीने थंड करते. तसेच ते पिल्याने गॅससारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. 4) मातीच्या बाटलीतील पाणी पिल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता हे पाणी पिल्यामुळे कमी होतो. 5) त्वचेच्या समस्या दूर होतात. तसेच त्वचाही चमकदार होते. 6) माती विषारी द्रव्ये शोषून घेते. त्यामुळे तुम्ही आजारापासून दूर राहवू शकता. हेही वाचा :
फिरत्या चाकावरती मातीला आकार, दिवाळीसाठी घ्या आकर्षक पणत्या! पाहा Video
गुगल मॅपवरून साभार
सोलापुरातील नीलम नगर परिसरात शंकर कुंभार यांचा मोठा कारखाना असून आठवड्याला शंभर बॉटल्स ते बनवतात. शंकर कुंभार यांच्याशी या नंबर संपर्क साधून 93703 82003 आपण या बॉटल्स खरेदी करू शकतात.