मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Solapur Ujava Kalva : व्हिडीओ! सोलापूरमध्ये उजनीचा उजवा कालवा फुटला, शेतकऱ्यांच्या घरांसह द्राक्षे, उसात पाणी

Solapur Ujava Kalva : व्हिडीओ! सोलापूरमध्ये उजनीचा उजवा कालवा फुटला, शेतकऱ्यांच्या घरांसह द्राक्षे, उसात पाणी

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावात उजनीचा उजवा कालवा फुटला आहे. दरम्यान हा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावात उजनीचा उजवा कालवा फुटला आहे. दरम्यान हा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावात उजनीचा उजवा कालवा फुटला आहे. दरम्यान हा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर (प्रितम पंडीत) , 29 जानेवारी : सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावात उजनीचा उजवा कालवा फुटला आहे. दरम्यान हा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उजनीचा उजवा कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेता त पाणीच पाणी झाले होते. उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये 500 क्युसेस पाणी सोडण्यात आले होते. यावेळी कालवा फुटल्याने पाटकुल येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची घरे शेतात आहेत त्या शेतकऱ्यांच्या घरात गुडघ्याभर पाणी गेल्याने घरांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे डाळिंब, ऊस इतर पिके वाहून गेल्याने हातातोंडाशी आलेली पिकेच गेली आहेत. पाटकुल गावाजवळील कॅनलला भगदाड पडल्याने हा प्रकार घडला आहे.

हे ही वाचा : Video : सोलापुरात उंचीचा अंदाज न आल्याने काळविटांचा अख्खा कळपच पुलावरुन खाली..

मोहोळ तालुक्यातील पाटकुल या गावात उजनी पाटबंधारे विभागाचा हा उजवा कालवा फुटला आहे.  हा कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतात पाणीच पाणी झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील डाळिंबासह ऊस आणि इतर पिके वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.

उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये 500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला होता. यावेळी अचानक पाटकुल गावात उजवा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाटकुल येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

उजनी धरणातून येणारा मोठा उजनी उजवा कालवा 112 किमीचा आहे. रविवारी पहाटे पाटकुल ओढ्याजवळ हा कालवा फुटला. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह विहिरींचं देखील मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. पुराची स्थिती निर्माण झाली आहे.

कालवा फुटल्याने द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर मोटार पंप वाहून गेल्या आहेत. अजूनही पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने उभ्या ऊसातून मातीसह पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. ऊस शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा : सोलापूरमध्ये लग्नाळू पोरांनी काढला होता मोर्चा, आता तर मुली दाखवण्याच्या नावाखाली घडलं भयंकर

शेकडो एकर शेतामध्ये पाणी साचल आहे. या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

First published:

Tags: Solapur, Solapur (City/Town/Village), Solapur news, Solapur S13p42