मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : सोलापुरात उंचीचा अंदाज न आल्याने काळविटांचा अख्खा कळपच पुलावरुन खाली..

Video : सोलापुरात उंचीचा अंदाज न आल्याने काळविटांचा अख्खा कळपच पुलावरुन खाली..

काळविटांचा अख्खा कळपच पुलावरुन कोसळला

काळविटांचा अख्खा कळपच पुलावरुन कोसळला

केगाव विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून काळविटांचा कळप खाली पडला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर, 28 जानेवारी : सोलापुरात केगाव विजापूर राष्ट्रीय महामार्गावर अंडरपास पुलावरून खाली पडून झालेल्या अपघातात 12  काळविटांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला तर दोन काळवीट जखमी झाले आहेत. देशमुख वस्ती येथील अंडरपास पुलाचा अंदाज न आल्यामुळे काळवीटच्या कळपाने चाळीस फुटावर खाली उडी घेतली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमी काळवीटींना उपचारासाठी दाखल केले आहे. त्यामुळे केगाव येथील वन्य प्राण्यांचे अधिवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काय आहे घटना?

केगाव विजापूर महामार्गावर बायपास रोडवरील अंडरपास बोगदा झाला आहे. या बोगद्यावरून सायंकाळच्या सुमारास काळवीट्यांचा एक कळप पुलावर चढला. काळविटाच्या कळपाला अंडरपासचा उंचीचा अंदाज न आल्याने साधारणपणे चाळीस फुटावरून काळवीटांचा कळप खाली पडला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मृत पावलेल्या  काळवीट वनविभागात घेऊन गेले आहे. मात्र, वन्य प्राण्यांच्या अशा दुर्घटनेमुळे प्राणी प्रेमींनी मात्र हळहळ व्यक्त केली आहे. अपघातानंतर काळविटांना बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहचलो. येथे दहा ते 12 काळवीट रस्त्यावर पडलेले आढळले. यातील दोन काळवीट जिवंत होते. यानंतर आम्ही लगेच वनविभागाशी संपर्क साधून हे दोन काळवीट त्यांच्या ताब्यात दिले. तर उर्वरित मृत काळविटांना गाडीत भरुन नेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी दिली आहे.

वाचा - पती रायफलची साफसफाई करताना चुकून गोळी सुटली अन् पत्नी आली समोर

सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा, विजापूर या महामार्गाशेजारी वनविभागाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. येथे काळविटांसह अन्य प्राण्यांचा मोठा वावर असतो. तो त्यांच्यासाठी आदिवास जाहीर करण्यात आला आहे. परंतु, या महामार्गावर वर्दळ वाढल्याने वर्दळ वाढल्याने वन्यप्राण्यांचे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे.

काळविटांचे मृतदेह वनविभागाच्या ताब्यात

घटनास्थळी पोलीस पोहचल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाने याचा पंचनामा करुन मृत काळविटांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. गेल्या काही वर्षात अशा घटना वाढल्या असून वन्यजीवांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

First published:

Tags: Solapur, Wild animal