मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सोलापूरमध्ये लग्नाळू पोरांनी काढला होता मोर्चा, आता तर मुली दाखवण्याच्या नावाखाली घडलं भयंकर

सोलापूरमध्ये लग्नाळू पोरांनी काढला होता मोर्चा, आता तर मुली दाखवण्याच्या नावाखाली घडलं भयंकर

बार्शी शहरातील एका मंगल कार्यालयात सुशिक्षित युवकांचा वधू वर पालक परिचय मेळावा आयोजित केला होता.

बार्शी शहरातील एका मंगल कार्यालयात सुशिक्षित युवकांचा वधू वर पालक परिचय मेळावा आयोजित केला होता.

बार्शी शहरातील एका मंगल कार्यालयात सुशिक्षित युवकांचा वधू वर पालक परिचय मेळावा आयोजित केला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

प्रितम पंडित, प्रतिनिधी

सोलापूर, 29 जानेवारी : लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून काही दिवसांपूर्वी सोलापुरात तरुणांनी मोर्चा काढला होता. पण, आता बार्शीत शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. वधू-वर परिचय मेळावा वधू विनाच पार पडला. या मेळाव्याच्या नावाखाली अनेक लग्नाळू तरुणांची आणि कुटुंबीयांची फसवणूक झाली आहे.

बार्शी शहरातील एका मंगल कार्यालयात सुशिक्षित युवकांचा वधू वर पालक परिचय मेळावा आयोजित केला होता. सदर बार्शी शहरात वधू-वर मंडळाकडून तिसरा मेळावा घेण्यात आला होता. मात्र दोन्हीही मेळाव्यात लग्नाळू युवकांना वधू दाखवण्यात आली नाही. बार्शीतील मेळाव्यात हीच परिस्थिती होती. त्यामुळे भावी नवरदेवांच्या नातेवाईकांना संशय आला. मात्र बार्शीतील मेळाव्यात युवकांना वधू दाखवण्यात आली नाही. यातून आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर लग्नाळू युवक, कुटुंबीय, नातेवाईक बार्शी पोलीस ठाण्यात पोचले.

बार्शी शहरात शेकडो लग्नाळू युवकांना लग्नाचे आमिष दाखवून कथित वधू-वर मंडळाकडून हजारो रुपयांची फी घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले. रजिस्ट्रेशनच्या नावाखाली वधू वर मंडळाकडून लग्नाळू युवकांकडून पैसे उकळले. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात कथित वधू वर मंडळ चालक, महिला सह एजंटला ताब्यात घेतले आहे.

(Video : सोलापुरात उंचीचा अंदाज न आल्याने काळविटांचा अख्खा कळपच पुलावरुन खाली..)

या मेळाव्यासाठी इच्छुक नवरदेवांनी प्रत्येकी 10 हजार रुपये भरले होते. एवढंच नाहीतर मेळाव्याच्या दिवशी प्रत्येकी दीड हजार रुपये सुद्धा मागण्यात आले. पैसे घेऊन सुद्धा मुली दाखवल्याच नाही, असा आरोपच तरुणांच्या कुटुंबीयांनी केला.

(पतीच्या 'त्या' एका सवयीमुळे पत्नी आणि भावजयी जीवावर उठली; आधी जादूटोणा केला अन् नंतर थेट हत्याच)

पोलिसांनी तपास केला असता लग्नाळू मुलांच्या आई-वडिलांकडून लग्नासाठी पैसे घेतल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे कथित वधू-वर मंडळाचे बनावट रॅकेट उघड आल्याचे दिसून येते. पोलिसांनी वधु वर मंडळ चालक, महिला, एजंट ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published: