मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Solapur State Bank : मृत पत्नीचं खातं बंद करायला गेला अन् खात्यावरील रक्कम बघून पतीला बसला धक्का

Solapur State Bank : मृत पत्नीचं खातं बंद करायला गेला अन् खात्यावरील रक्कम बघून पतीला बसला धक्का

सोलापुरातील गायकवाड कुटुंबीय राहतात मागच्या काही दिवसांपूर्वी रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी  शिल्पा यांचे आकस्मिक निधन झाले.

सोलापुरातील गायकवाड कुटुंबीय राहतात मागच्या काही दिवसांपूर्वी रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी शिल्पा यांचे आकस्मिक निधन झाले.

सोलापुरातील गायकवाड कुटुंबीय राहतात मागच्या काही दिवसांपूर्वी रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी शिल्पा यांचे आकस्मिक निधन झाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर, 02 फेब्रुवारी : सोलापूर जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. सोलापुरातील गायकवाड कुटुंबीय राहतात मागच्या काही दिवसांपूर्वी रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी  शिल्पा यांचे आकस्मिक निधन झाले. दरम्यान ते मयत झालेल्या पत्‍नीच्या नावे असलेले बँक खाते बंद करायला गेले होते. यावेळी त्यांना पत्नीच्या खात्यावर वारसांच्या नावे दोन लाख रुपये जमा झाल्याचे आढळले. यामुळे मृत महिलेच्या पती आणि लेकरांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचे दिसून आले. दरम्यान या गरीब कुटुंबाने बँक मॅनेजरचे आभार व्यक्त केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील शिल्पा गायकवाड यांचे निधन झाल्यानंतर पती पती रवींद्र गायकवाड हे पत्नीच्या नावावर असलेले बँकेतील खाते बंद करण्यास गेले होते. दरम्यान खात्यावर असणारी थोडी रक्कम आपल्या खात्यावर वळवून घेऊ आणि खाते बंद करू या उद्देशाने ते गेले होते.

हे ही वाचा - 2 भावांच्या सेल्फीत दडलंय भयानक दृश्य; PHOTO झूम करताच तुमच्या अंगावरही काटा येईल

मात्र, स्टेट बँकेच्या मॅनेजरने सर्व चौकशी करून, प्रधानमंत्री जीवन योजने अंतर्गत पत्नीच्या खात्यावर दोन लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याचे सांगितले. बँक मॅनेजर यांनी केलेल्या कार्याबाबत रवींद्र गायकवाड यांना काही वेळ विश्वासच बसला नव्हता.

पण, बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री जीवन योजनेबाबत सर्व माहिती सविस्तर सांगितली. खाते बंद करायला गेले आणि वारसांच्या नावे दोन लाख रुपये जमा झाल्याने मृत महिलेच्या पती आणि लेकरांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या गरीब कुटुंबाने बँक मॅनेजरचे आभार व्यक्त केले.

रवींद्र गायकवाड (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर चार सोलापूर) हे बिगारी कामगार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. रवींद्र गायकवाड यांची पत्नी शिल्पा गायकवाड या सोलापुरातील रेल्वे स्टेशनवर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होत्या. एक महिन्यापूर्वी शिल्पा गायकवाड यांचे आकस्मित निधन झाले. शिल्पा गायकवाड यांचा मोठा आधार यांच्या कुटुंबाला होता. शिल्पा यांचे निधन झाल्याने संपूर्ण परिवाराची परवड सुरू झाली.

हे ही वाचा : चिमुकल्या लेकीच्या रूममधील 'ते' भयावह दृश्य पाहून वडिलांना दरदरून फुटला घाम; Shocking Video Viral

शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांनी रवींद्र गायकवाड यांच्या परिस्थिती बद्दल माहिती घेतली असता बँक अधिकाऱ्यांनी रवींद्र गायकवाड यांना सदर रक्कम तीन मुलींच्या नावाने एफडी करून देण्यात आली. भविष्यात मुलींच्या लग्नासंदर्भात किंवा शिक्षणासंदर्भात लाभ घेता येईल. असे शाखा अधिकारी यांनी रवींद्र गायकवाड यांना सांगितले आणि त्यावेळेस रवींद्र गायकवाड यांनी देखील होकार दिला.

First published:

Tags: Solapur, Solapur (City/Town/Village), Solapur news