मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर मार्गावरील 'वंदे भारत'ला मोठा अडथळा, पाहा काय आहे कारण

Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर मार्गावरील 'वंदे भारत'ला मोठा अडथळा, पाहा काय आहे कारण

Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

    अनुराग सुतकर, प्रतिनिधी

    सोलापूर, 2 फेब्रुवारी :   मुंबई-सोलापूर दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसबद्दल सोलापूरकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या रेल्वेनं हा प्रवास कमी वेळात पूर्ण होईल. ही दोन शहरं एकमेकांच्या आणखी जवळ येतील. ही एक्स्प्रेस सुरू होण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असतानाच एक महत्त्वाची अपडेट समोर आलीय. त्यामुळे या मार्गावर लवकरच सुरू होणाऱ्या 'वंदे भारत' च्या स्पीडला ब्रेक लागण्याची भीती आहे.

    काय आहे अडथळा?

    'वंदे भारत' एक्स्प्रेसचा वेग प्रतितास 180 किलोमीटर आहे. पण, ती मुंबई-सोलापूर दरम्यान 110 किलोमीटरच धावणार आहे. या मार्गावरील रेल्वे ट्रॅकचं अपग्रेडेशन अद्याप पूर्ण झालेलं नाही. हे काम सुरू असल्यानं 'वंदे भारत' च्या गतीला ब्रेक लागणार आहे.

    कर्जत ते लोणावळा सेक्शनमध्ये घाट आणि ट्रॅक चढावर असल्याने याठिकाणी देखील तांत्रिक अडथळे दूर करण्याचे काम रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ट्रॅक’अपग्रेडेशनचे काम होणार नाही, तोपर्यंत वंदे भारत एक्सप्रेसची गती वाढणार नाही अशीही चर्चा सुरू आहे.

    Vande Bharat Express : 'तो' फोटो Viral होताच रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा, आता प्रवाशांनाच...

    ट्रॅक अपग्रेडेशन केल्यावर ताशी 110 हून वाढून 130 किलोमीटर होईल. हे काम करण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. यामध्ये स्लीपर बदलणे, रुळ बदलणे, खडी बदलणे, वळणाच्या ठिकाणी तीव्रता कमी करणे या कामाचा समावेश आहे. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग ताशी 130 किमी असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

    कशी आहे वंदे भारत ट्रेन?

    -16 कोच, 1128 आसनक्षमता

    -कोचमध्ये 32 इंच डिजिटल स्क्रीन

    -पूर्ण वातानुकूलित, ऑटोमॅटिक गेट सिस्टिम

    -लगेज रॅकमध्ये विमानात असणारी एलईडी डिफ्यूज लाइट्स

    'कवच' या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

    -दिव्यांगांची विशेष काळजी, ब्रेल लिपीतून माहिती

    - स्वदेशी बनावटीची, 'मेक इन इंडिया' उपक्रमाची निर्मिती

    -सोलापूर - मुंबई दरम्यान दादर, ठाणे, लोणावळा, पुणे आणि कुर्डुवाडीला थांबा

    -आठवड्यातून सहा दिवस धावणार

    मुंबईतील 'या' स्टेशनवरही थांबणार वंदे भारत एक्स्प्रेस, वाचा नवे वेळापत्रक

    वंदे भारतच्या तिकीटाबद्दलची माहिती अजून जाहीर झालेली नाही. रेल्वे विभागाच्या तांत्रिक अडचणीचा विचार करून ही गाडी सुरू करण्याच्या तारखेत एखादा दिवस मागे-पुढे होऊ शकतो. याबाबत वरिष्ठांकडून अधिकृत पत्रक आले की जाहीर करू अशी माहिती सोलापूर येथील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले यांनी दिली आहे.

    First published:

    Tags: Local18, Mumbai, Solapur, Train