सोलापूर, 7 जुलै : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी पायानं ओवाळल्यानंतर लक्ष्मी शिंदे ही तरूणी चांगलीच चर्चेत आहे. लक्ष्मीला दोन्ही हात नाहीत. त्यामुळे तिने उपमुख्यमंत्र्यांना पायानं ओवाळलं होतं. त्यानंतर लक्ष्मीच्या आजवरच्या प्रवासाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या सर्व जग सलाम करत असलेल्या सोलापूरच्या लक्ष्मीनं तिचा आजवरचा प्रवास ‘लोकल18’ शी बोलताना उलगडला आहे. गर्भ काढण्याचा सल्ला लक्ष्मी पोटात असतानाच डॉक्टरांनी तिला दोन्ही हात नाहीत, याची कल्पना दिली होती. त्याचबरोबर गर्भ काढण्याचा सल्ला तिच्या आई-वडिलांना दिला होता. त्यावर ‘ही मुलगी मला देवानं दिलेलं गिफ्ट आहे. मी ते नाकारणार नाही. ती जशी आहे तशी मला हवीय,’ असं वडिलांनी सांगितल्याचा अनुभव लक्ष्मीनं सांगितला आहे.
रायटर न वापरता परीक्षा लक्ष्मीचे वडिल रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. त्यांनी मला स्वत:च्या पायावर उभं केलंय. आई वडिलांच्या प्रोत्सहनामुळेच मी BA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. त्याचबरोबर आजवर कोणत्याही परीक्षेला रायटर वापरला नाही. पदवी शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात शिकत असताना पायाला जखम झाली असताना सुद्धा तिने स्वतः पेपर लिहून 65 टक्के मार्क्स मिळवले.सध्या लक्ष्मी ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. 400 रुपयांमध्ये करा महिनाभराचा स्वयंपाक, सोलापूरच्या प्राध्यापकाचे भन्नाट संशोधन देवेंद्र फडणवीस यांना ओवाळण्याचा अनुभव खूप वेगळा होता. त्यानंतर अनेकांनी फोन करून आपलं अभिनंदन केलं. लहाणपणी मैत्रिणींच्या वस्तूला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्याकडून तिरस्काराची वागणूक मिळत असे. पण गेल्या काही दिवसांमध्ये खूप वेगळा अनुभव येत आहे, असंही लक्ष्मीनं यावेळी सांगितलं. अपंगत्वामुळे निराश न होता मोठ्या जिद्दीनं लक्ष्मीनं आजवर वाटचाल केलीय. तिच्या या प्रवासामुळे भविष्यात अनेकांना प्रेरणा मिळणार आहे.