सोलापूर 28 जून : स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किंमती हा सर्वसामान्यांच्या काळजीचा विषय आहे. हा त्रास आता कमी होऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्याचे प्राध्यापक मनोजकुमार माने यांनी खास बायोस्टोव्ह तयार केलाय. या स्टोव्हमध्ये अत्यंत कमी पैशांंमध्ये एका कुटुंबाचा महिनाभराचा स्वयंपाक करणे शक्य आहे.त्यांच्या या प्रोजेक्टला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम स्कीलेथॉन 2023 या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकांचं बक्षीस मिळालं आहे. काय आहे प्रकल्प? प्रा. माने यांनी बायोमास म्हणजेच नैसर्गिक ऊर्जा तयार करून बायो फुयल तयार केलंय. बायोमास गॅस शेगडीचा वापर करून आपण त्यावर स्वयंपाक बनवू शकतो. त्याचबरोबर इंधन म्हणूनही त्याचा वापर केला जातो. इतर इंधन, इलेक्ट्रिसिटी आणि एलपीजी गॅस यांच्या तुलनेत हे इंधन स्वस्त आहे, असा दावा माने यांनी केलाय.
शेतामध्ये काम करताना मला ही आयडिया सुचली. हा संपूर्ण प्रकल्प मी शेतामध्येच उभारलाय. 400 ग्रॅम बायोमासमध्ये दीड तास व्यवस्थित स्टोव्ह चालतो.एलपीजी गॅसच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्याला हा पर्याय होऊ शकतो. आम्ही पंचवीस किलोच्या बॅग त्यांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा खर्च 400 रुपये इतका आहे. त्यामध्ये पाच ते सहा व्यक्तींच्या कुटुंबाचा महिनाभराचा स्वयंपाक होऊ शकतो, असे माने यांनी सांगितले. 30 चं ॲव्हरेज, 500 किलो वाहण्याची क्षमता, शिक्षकाने भंगारातून तयार केली जु’गाडी’ VIDEO ही सर्व एनर्जी निसर्गातूनच मिळालेली आहे. त्यात धूळ, कार्बन काही नाही. त्याचा एकूण खर्च हा कमी आहे. तो आगामी काळात आणखी कमी करून हा प्रयोग देशपातळीवर नेण्याचा प्रयत्न आहे, असं माने यांनी सांगितलं.