प्रितम पंडीत (सोलापूर), 23 नोव्हेंबर : सोलापुरात पर पुरुषाकडे पाहू नये म्हणून एका वीस वर्षीय पत्नीचे टक्कल केल्याची धक्कादायक घटना घडली. ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली, त्यावेळी उघडकीस आली. पत्नीने सर्व हकीकत सांगितल्यानंतर पोलीस ही थक्क झाले. याप्रकरणी पती कलीम सत्तार चौधरी, सासू राजिया सत्तार चौधरी, सासरे सत्तार चौधरी (सर्व रा, राजेंद्र चौक,सोलापूर) याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेचा विवाह जोड बसवण्णा चौकातील कलीम चौधरी या तरुणाशी मे महिन्यात झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनीच पतीने पीडितेवर संशय घेण्यास सुरुवात केली. सासरकडील मंडळी हार बनवण्याचा व्यवसाय करत असून सगळेजण तिला एकटीला घरी कोंडून व्यवसायासाठी जात होते. तरीही तिच्यावर नवरा संशय घेत होता.
हे ही वाचा : तरुणीला प्रायव्हेट पार्टवर ब्लेडनं लिहायला लावलं, माथेफिरुला पोलिसांनी केलं अटक
यातूनच पीडितेच्या पतीने संशय घेत, तिला तुझे केस मला आवडत नाहीत, असे म्हणत तिला केस काढून टक्कल करायचे असल्याचे सांगितले. हे ऐकताच तिने साफ नकार दिला; पण त्यानंतर पतीने रागाच्या भरात तिच्याशी न बोलणे, जेवण न करणे मारहाण करणे अशी वागणूक सुरु केली.
यामुळे पीडितीने मनावर दगड ठेवून केस कापण्यास होकार दिला. केस कापण्यासाठी आल्यानंतरही त्यावेळी अगोदर विरोध केला नंतर ती नाईलाजाने शांत राहिली, अशी माहिती पीडितेच्या आईवडिलांनी दिलीय.
दरम्यान,पीडितेच्या पतीने बाहेरून नाभिकाला बोलावून पत्नीचे केस पूर्णतः काढून टाकले. हा प्रकार पीडितेने आपल्या माहेरी सांगितला नाही. काही दिवसानंतर माहेरच्या लोकांनी कार्यक्रमानिमित्त पीडितेला व जावयाला घरी बोलावले. त्यावेळी पतीने पीडित सुमय्याला घरी नेऊन सोडले. त्यावेळी पीडितेने आपल्याबरोबर झालेली घटना आई-वडिलांना सांगितली.
हे ही वाचा : श्रद्धाची हत्या का केली?, आफताफने कोर्टात सांगितली ‘ती’ परिस्थिती…
यानंतर तरीही पीडितेच्या आई-वडिलांनी मुलीला सासरी नांदविण्यासाठी घेऊन जातील असे वाटून याची तक्रार केली नाही; पण २२ दिवसानंतरही पीडितेने पतीने पीडितेच्या कुटुंबीयांचे फोन घेणे टाळले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल करण्यासाठी जेलरोड पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलिसांनी पीडित सुमय्याची विचारपूस केली. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पीडिता जेव्हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेली होती तिच्या डोक्यावर थोडे केस आलेले दिसून येत होते.