मुंबई, 22 नोव्हेंबर : महिला आणि मुलींशी गैरवर्तन होत असल्याच्या घटना सतत आपल्या कानावर पडत असतात. अगदी स्वत:च्या घरातदेखील महिला सुरक्षित नसल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. अश्लील भाषा वापरून, अश्लील वर्तणूक करून किंवा जीवे मारण्याची धमकी देऊन मुली-महिलांशी गैरवर्तन केलं जातं. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका 25 वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थ्याला एका तरुणीला धमकावल्याच्या प्रकरणावरून अटक करण्यात आली आहे. या मुलानं पीडित मुलीला तिच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडनं त्याचं नाव लिहिण्यास भाग पाडलं होतं आणि नंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही केला होता. 21 वर्षीय पीडितेच्या पालकांनी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. एफआयआरनुसार, पीडिता आणि आरोपी लखनौमधील एका खासगी संस्थेत नर्सिंगचा कोर्स करत आहेत. दोघेही मॉल परिसरात असलेल्या सीएचसीमध्ये इंटर्नशिप करत आहेत. ‘इंडिया टीव्ही’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काय आहे प्रकरण? पश्चिम विभागाचे एडीसीपी चिरंजीव नाथ सिन्हा यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘आरोपी अवेंद्र सोनावली यानं पीडित मुलीशी मैत्री केली आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी तिचा मोबाईल नंबर मिळवला. त्याने मुलीशी व्हॉट्सअॅh कॉलद्वारे बोलण्यास सुरुवात केली. ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे,’ अशी बतावणी त्यानं केली. पण, मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर तो मुलगी राहत असलेल्या ठिकाणीही गेला आणि चाकूचा धाक दाखवून तिचा अश्लील व्हिडिओ बनवला. माझ्याशी लग्न कर नाहीतर परिणामांना सामोरी जा, अशी धमकीही त्यानं तिला दिली होती.’ श्रद्धाची हत्या का केली?, आफताफने कोर्टात सांगितली ‘ती’ परिस्थिती… एडीसीपी सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं पुन्हा पीडित मुलीला व्हिडिओ कॉल करून, लग्न केलं नाही तर तिला आणि तिच्या पालकांना मारून टाकेल, अशी धमकी दिली. त्याने मुलीला व्हिडिओ कॉलवर तिचं रक्त दाखवण्याचीही मागणी केली. तिच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडनं त्याचं नाव लिहिण्यास भाग पाडलं. नंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. मुलीच्या पालकांपर्यंत ही बातमी पोहोचल्यानंतर त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली. ‘सोमवारी (21 नोव्हेंबर) पीडित मुलीनं पोलीस आणि न्यायदंडाधिकार्यांसमोर आपला जबाब नोंदवला. त्याआधारे आम्ही आरोपीला अटक केली आहे,’ अशी माहिती एडीसीपी सिन्हा यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.