नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. साकेत न्यायालयाने आफताबच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली. कोर्टाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी घेतली आणि यादरम्यान आफताबने न्यायाधीशांना हत्या कोणत्या अवस्थेत केली, याबाबत सांगितले. यादरम्यान आफताबने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचे न्यायाधीशांना सांगितले. आफताबची पोलीस कोठडी आज संपत आहे. आफताब आतापर्यंत 10 दिवस पोलीस कोठडीत असून आणखी 4 दिवस तो राहणार आहे. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आफताबच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीदरम्यान श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताबने न्यायाधीशांसमोर सांगितले की, जे केले ते चुकीचे आहे. आपल्यावर जे काही आरोप केले जात आहेत, त्या आरोपांमध्ये तथ्य नाही, पण माझ्याकडून जे काही केले गेले ते रागाच्या भरात करण्यात आले, असेही आफताबने म्हटले आहे. त्याचवेळी, कोर्टाकडून आफतापच्या कोठडीची मागणी करताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आरोपी आफताब पोलिस तपासात सहकार्य करत नाहीये. पोलिसांच्या प्रश्नांना तो सरळ उत्तरे देत नाहीये. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांनी अद्याप श्रद्धाचे काही अवयव आणि गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त केलेले नाही. त्यामुळे त्याला आफताबच्या कोठडीत वाढ करण्यात यावी. दिल्लीच्या मेहरौली येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या आफताब पूनावालला त्याच्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धासोबत पोलिसांनी 12 नोव्हेंबरला अटक केली होती. आफताबने मेहरौली येथील घरात श्रद्धाचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून अनेक दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याचा आरोप आहे. नंतर हळूहळू तिच्या मृतदेहाचे तुकडे अनेक महिने वेगवेगळ्या ठिकाणी फेकत राहिला. हेही वाचा - श्रद्धाचे शीर शोधण्यासाठी तलाव उपसणार; शरीराचे 17 तुकडे हाती, उद्या खरी परीक्षा आफताबची नार्को टेस्ट होणार - श्रद्धा हत्याकांडप्रकरणी आफताब पूनावालाची नार्को टेस्ट होणार आहे. आपली ‘लिव्ह-इन पार्टनर’ श्रद्धा वालकरच्या हत्येचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावालाची नार्को चाचणी रोहिणी येथील डॉ. बाबा साहेब आंबेडकर रुग्णालयात होणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताफने 18 मे रोजी श्रद्धा वालकरचा (वय-27) गळा दाबून खून केला होता आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते, दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्यांच्या निवासस्थानी सुमारे तीन आठवडे 300 लिटर फ्रिजमध्ये ठेवले होते आणि नंतर त्यांची विल्हेवाट लावली होती. शहरात अनेक ठिकाणी मध्यरात्रीनंतर फेक झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.