सोलापूर, 27 डिसेंबर : सोलापुरात समाज कल्याण विभागातील एका आश्रमशाळेतील शिक्षिकेचे मागच्या काही काळापासून वेतन थकलेले होते. दरम्यान ते वेतन अदा केल्याचा मोबदला म्हणून समाज कल्याण विभागाच्या दोघा शिपायांनी पाच लाख रूपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समाजकल्याण विभागातील शिपायाला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. दरम्यान यातील दुसरा शिपाई पळून गेला आहे. सोलापूर एसीबीच्या पथकाने ही कारवाई विजापूर रोडवरील हॉटेल सिद्धेश्वर येथे केली.
हे ही वाचा : जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं; प्रियकरानं गर्लफ्रेंडला जमिनीवर पाडून बेशुद्ध होईपर्यंत लाथांनी मारलं
आश्रमशाळेतील शिक्षिकेचा प्रलंबित पगार काढल्याच्या मोबदल्यात चक्क वरिष्ठांच्या नावाने शिपायाने पाच लाख रुपये लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. अशोक गेमु जाधव असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे. तर किसन मारुती भोसले हा पळून गेले आहे.
प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही भ्रष्ट
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांना पाठीशी घालणाऱ्या उप प्रादेशिक अधिकारी अजित पाटील यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगहात पकडल्याचा प्रकार समोर आला आहे.
हे ही वाचा : औरंगाबाद : आईवडील खर्चाला पैसे देत नाहीत म्हणून दोघांचं भयानक कृत्य, वाचून बसेल धक्का
प्रदूषण नियंत्रण मंडळातील आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई आहे. साखर कारखान्याचे डिस्टलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन्स नुतनीकरण करण्यास मदत केल्याबाबत मोबदला तसेच कारखान्यांकडून हवा व पाणी प्रदुषण होत असल्याने लोकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याकरीता 2 लाखांची लाच घेताना पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Solapur, Solapur (City/Town/Village), Solapur news