जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद : आईवडील खर्चाला पैसे देत नाहीत म्हणून दोघांचं भयानक कृत्य, वाचून बसेल धक्का

औरंगाबाद : आईवडील खर्चाला पैसे देत नाहीत म्हणून दोघांचं भयानक कृत्य, वाचून बसेल धक्का

जप्त करण्यात आलेली वाहने

जप्त करण्यात आलेली वाहने

औरंगाबाद शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून बऱ्याच दिवसापासून मोटरसायकल चोरीला जात होत्या.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 26 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता आणखी एक धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. आई-वडील पैसे देत नाहीत म्हणून खर्चासाठी 36 दुचाकी चोरल्याची घडना उघडकीस आली आहे. तसेच या विद्यार्थ्यांनी अनोखी शक्कल लढवली. त्यांनी या दुचाकी शेतात लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी चोरीच्या 36 मोटरसायकलसह तब्बल 21 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरीच्या मोटरसायकल चोरट्यांनी स्वतःच्या शेतात लपून ठेवल्या होत्या. याप्रकरणी दोन मोटरसायकल चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण -  औरंगाबाद शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून बऱ्याच दिवसापासून मोटरसायकल चोरीला जात होत्या. याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक देखील सज्ज करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेश खेडकर याने कन्नड तालुक्यातील त्याच्या शेतामध्ये या चोरलेल्या मोटरसायकल ठेवलेल्या होत्या. पोलिसांनी कन्नड मध्ये जाऊन पाहणी केली असता त्याच्या शेतात 24 मोटरसायकल मिळून आल्या तर त्याचाच दुसरा साथीदार विजय अळींग याच्या शेतामध्ये 12 मोटरसायकल मिळून आल्या. अशा 36 मोटरसायकल गुन्हे शाखेने जप्त करून तब्बल 21 लाख 95 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हेही वाचा -  जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं; प्रियकरानं गर्लफ्रेंडला जमिनीवर पाडून बेशुद्ध होईपर्यंत लाथांनी मारलं औरंगाबादेत 2 किलो सोन्याची मूर्ती बदलल्याने खळबळ - औरंगाबादच्या कचनेर येथील श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातून सोन्याची दोन किलो वजनाची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती चोरट्यांनी लांबवली. मात्र, चोरी पकडली जाऊ नये म्हणून त्याजागेवर दुसरी मूर्ती आणून ठेवली. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत. पोलीस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्यभर गाजलेल्या जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ गावातील राम मंदिर चोरी प्रकरणात गेल्या महिन्यात शोध लागला असताना आता पुन्हा औरंगाबादच्या कचनेर येथील जैन मंदिरातील मूर्तीची अदलाबदल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात