मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोलापूरमध्ये जानेवारी महिन्यात दिवाळी साजरी, 2 वर्षांनी आला 'तो' योग! Video

सोलापूरमध्ये जानेवारी महिन्यात दिवाळी साजरी, 2 वर्षांनी आला 'तो' योग! Video

X
Siddheshwar

Siddheshwar yatra Solapur : सोलापूरमध्ये पाच दिवस चालणाऱ्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा चौथा दिवस सोमवारी झाला. या दिवशी दोन वर्षांनी सोलापूरकरांना दिवाळी अनुभवता आली.

Siddheshwar yatra Solapur : सोलापूरमध्ये पाच दिवस चालणाऱ्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा चौथा दिवस सोमवारी झाला. या दिवशी दोन वर्षांनी सोलापूरकरांना दिवाळी अनुभवता आली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर 17 जानेवारी : सोलापूरमध्ये पाच दिवस चालणाऱ्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा चौथा दिवस सोमवारी झाला. चौथ्या दिवशी शोभेचे दारूकाम हे मुख्य आकर्षण असते. कोरोना महामारीच्या संकटानंतर दोन वर्षांनी ही यात्रा सुरू झाली आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येनं सोलापूरकर हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक होते. दोन वर्षांनी झालेल्या या दारूकामामुळे सोलापूरकरांनी जानेवारी महिन्यात दिवाळी अनुभवली.

समाजप्रबोधनासाठी वापर

कोरोना महामारीच्या संकटापासून सर्वांनी कशी काळजी घ्यावी, तसंच कोरोना प्रतिबंधात्मक घोषणवाक्य हे या दारूकामाचे मुख्य आकर्षण होतं. त्याचबरोबर अत्यंत सुंदर असा लेझर शो देखील यावेळी प्रेक्षकांना दाखवण्यात आला. श्री सिद्धेश्वर महाराजांचे सोलापूरसाठी असलेले कार्य आणि विविध ठिकाणी त्यांनी केलेली प्रबोधनात्मक कामे या लेझर शोच्या माध्यमातून दाखवण्यात आली.

विद्युत रोषणाईचा माध्यमातून  सिद्धेश्वर मंदिराचा संपूर्ण परिसर यावेळी प्रकाशित झाला होता.  सिद्धेश्वर महाराजांच्या आयुष्यावरील लेझर शो पाहाताना अनेक भाविकांना अश्रू आवरले नाहीत. हा लेझर शो पाहताना खऱ्या स्वरूपात सिद्धेश्वर महाराज अवतरल्याचा भास होत असल्याची भावना भाविकांनी यावेळी बोलून दाखवली.

सिद्धेश्वर यात्रेतील मानकऱ्यांना सरकारकडून आहेर का दिला जातो? पाहा Video

'कोरोना काळात दोन वर्ष ही यात्रा बंद होती. यंदा ती पुन्हा सुरू झाली आहे. इथून पुढे दरवर्षी ही यात्रा अशीच सुरू राहावी. सोलापूरकरांवर कोणतेही संकट येऊ नये. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी,'  हे मागणं आम्ही सिद्धेश्वरांकडे व्यक्त केलंय, अशी प्रतिक्रिया यात्रेत सहभागी झालेले भाविक आदित्य मुडके आणि ऋषिकेश गुमटे यांनी व्यक्त केली.

भाकणुकीच्या भाकिताची चर्चा

सिद्धेश्वर यात्रेच्या तिसऱ्या दिवशी भाकणुकीची प्रथा झाली. यावेळी वासरू आल्यानंतर अचानक बिथरल्यानं यावर्षी मोठी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते असा अंदाज यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांनी व्यक्त केला. ' मागच्या 25 वर्षात मी वासराला पहिल्यांदाच इतकं आक्रमक पाहिलं आहे.  यापूर्वी महाराष्ट्रात किल्लारीमध्ये भूकंप झाला होता. त्यावेळी वासरानं अशाच प्रकारे वेगळा आवाज काढला होता. त्यानंतर ते सर्वांवर धावून गेले होते. अशी आठवण त्यांनी सांगितली.

त्यापूर्वी 1985 साली वासरू अंगावर धावून आले होते. तेव्हाचे वर्ष देखील व्यवस्थित गेले नव्हते. यावर्षी  जे वाईट घडेल ते सोलापूरच्या बाहेर घडेल. सोलापूरमध्ये काहीही होणार नाही. हा मला विश्वास आहे.' असा अंदाज हिरेहब्बू यांनी सांगितला. सोमवारी म्हणजेच यात्रेच्या चौथ्या दिवशीही सोलापुरमध्ये भाकणुकीच्या भाकिताचीच चर्चा होती.

First published:

Tags: Local18, Solapur