जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News : विद्यार्थ्यांना अध्यात्मिक ज्ञानाचे धडे, संतांच्या अभंगासह पावलीचे प्रशिक्षण, Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : विद्यार्थ्यांना अध्यात्मिक ज्ञानाचे धडे, संतांच्या अभंगासह पावलीचे प्रशिक्षण, Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : विद्यार्थ्यांना अध्यात्मिक ज्ञानाचे धडे, संतांच्या अभंगासह पावलीचे प्रशिक्षण, Video

विद्यार्थ्यांना अध्यात्माचे ज्ञान व्हावे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना अध्यात्माचे धडे देण्यात आले.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 12 जून : मराठवाड्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. अशातच विद्यार्थ्यांना अध्यात्माचे ज्ञान व्हावे यासाठी  छत्रपती संभाजीनगर  मधील धर्मवीर संभाजी विद्यालयामध्ये अध्यात्मिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना अध्यात्माचे धडे देण्यात आले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. काय होता उद्देश? मुलांवर चांगले संस्कार व्हावे तसे त्यांना अध्यात्माची गोडी लागावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने मुली सुद्धा सहभागी झाल्या होत्या. तसेच या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चातून या शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना हरिपाठ, भजने, संतांचे अभंग, संतांचे चरित्र त्याचबरोबर वारीमध्ये जी पावली खेळली जाते या सर्वांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अध्यात्माचे संस्कार व्हावे  मुलांमध्ये अध्यात्माचे संस्कार व्हावे त्याचबरोबर त्यांना संतांची माहिती व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. आमच्या या शिबिरातून दोन मुले जरी अध्यात्माकडे वळले तरी आमचे शिबिर सफल होईल, असं धर्मवीर संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण बाभुळगावकर यांनी म्हटले आहे. आम्हाला खूप काही शिकायला भेटलं या शिबिरामध्ये आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. आम्ही इथे संतांची चरित्र वाचले संतांची पूर्ण माहिती भेटली. संतांचे अभंग वारीमध्ये जी पावली खेळली जातात ती सुद्धा आम्हाला इथे शिकवले. त्यामुळे इथे येऊन मला खूप छान वाटलं, असं सहभागी विद्यार्थी श्राव्या सरोदे हिने सांगितले.

Pune News : पालखीच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचे रायडर्स सज्ज, नव्या तंत्रज्ञानानं घेणार वारकऱ्यांची काळजी, Video

सुसंस्कार विद्यार्थ्यांवर घडतील या शिबिरातून सुसंस्कार विद्यार्थ्यांवर घडतील अशी मला आशा आहे. विद्यार्थ्यांनी अध्यात्माकडे वळावे, असं कृष्ण आरगडे महाराज यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात