अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर 28 मार्च : मराठी चित्रपटाच्या सर्व फॅन्सना सध्या 'घर बंदूक बिरयानी' या सिनेमाची उत्सुकता लागलीय. अनेक सुपरहिट सिनेमे देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यामध्ये अभिनय करताना दिसणार आहे. नागराजसोबत सयाजी शिंदेही यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाच्या धमाकेदार ट्रेलरला जोरदार प्रतिसाद मिळालाय. येत्या 7 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिमेमाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम सोलापूरमध्ये आली होती. त्यावेळी नागराजनं या सिनेमाच्या मागील गोष्ट सांगितली आहे.
काय आहे सिनेमा?
'मी,सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर हे तिघं हा सिनेमा करतोय.मी यापूर्वी लहान-मोठ्या भूमिका केल्या होत्या.पण,पहिल्यांदाच मोठी भूमिका करणार आहे. मागच्या तीन-चार वर्षांपासून ही फिल्म डोक्यात होती. वेगवेगळ्या टप्प्यावर यावर काम केलं आहे. माझ्या आधीच्या सिमेमापेक्षा ही वेगळी फिल्म आहे. घर बंदूक आणि बिरयानी या नावाला साजेशी या सिनेमाची स्टोरी असल्याचं नागराजनं सांगितलं.
राजमहाल सोडला, पळून जाऊन केलं लग्न, बॉलिवूडला धुडकावणारी अभिनेत्री आता 2मुलांची आई
दक्षिणात्य चित्रपट गाजवलेले मराठमोळे कलाकार सयाजी शिंदेंचीही या सिनेमात मुख्य भूमिका आहे. त्यांनी प्रेक्षकांना हा सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे.'कुणाच्या सांगण्यावरुन मत ठरवू नका. तुम्ही स्वत: थिएटरमध्ये सिनेमा पाहायला या आणि मत ठरवा. मराठी प्रेक्षकांनी दक्षिण भारतीय सिनेमांच्या फॅन्सचं अनुकरण केलं पाहिजे. ते फॅन्स थिएटरमध्ये येऊन सिनेमा पाहतात आणि मत ठरवतात. हा अतिशय भन्नाट सिनेमा झाला असून तुम्हाला नक्की आवडेल,' असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
ज्योतिष सांगणाऱ्या भगरे गुरूजींच्या लेकीचा घायाळ करणारा अंदाज; चाहते क्लिन बोल्ड
सैराट आणि नागराज मंजुळे हे समीकरण कायमचं जोडलं गेले. सिनेमातील आर्ची आणि परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे दोन चेहरे मराठी सिनेसृष्टीला मिळाले. सिनेमातील आकाश आणि नागराज मंजुळे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि सयाजी शिंदे यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. नागराज मंजुळे आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत आहे. तर सयाजी शिंदे दहशतवाद्याच्या भूमिकेत दिसत आहे. नागराज आणि सयाजी शिंदेंचा अँक्शन मोड तर आकाश ठोसर आणि अभिनेत्री सायलीचा रोमँटिक अंदाज या सिनेमात दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Marathi cinema, Marathi entertainment, Nagraj manjule, Solapur