रंग माझा वेगळा मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनघा अतुल आता सर्वांच्याच परिचयाची झाली आहे.
झी मराठीवर सकाळी लागत असलेल्या वेध भविष्याचा हा कार्यक्रमातील ज्योतिषाचार्य अतुल भगरे गुरुजींची ती कन्या आहे.
अनघानं कोठारे व्हिजनमध्ये मॅनेजर म्हणून काम केलं आहे. अनेक मालिका आणि नाटकांमध्येही तिनं काम केलंय.
अनघा सोशल मीडियावर सक्रीय असून ती मॉडेलिंगही करते. तिचे हॉट अँड बोल्ड फोटो देखील ती शेअर करत असते.
तिच्या अदांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. अनघा ग्लॅमरस लुक शिवाय मराठमोळ्या लुकमध्येही तितकीच सुंदर दिसते.