सोलापूर, 26 नोव्हेंबर : 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत घडलेल्या दहशतवादी हल्ल्याला 14 वर्षं उलटली आहेत. या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त शहीद अशोक कामटे यांना वीरमरण आलं. त्यांना श्रद्धांजली म्हणून 26 नोव्हेंबरला स्पर्शरंग कला परिवाराने सोलापूर पोलीस मुख्यालयात कामटे यांची 70 फुटांची दगडी खडीपासून बनवण्यात आलेली प्रतिमा साकारली आहे.
ही प्रतिमा पूर्ण तयार करण्यासाठी 2 दिवस इतका कालावधी लागला आहे. 1 ब्रास खडी वापरून 30 तास राबून या कलाकारांनी 70 फुटांची अत्यंत उत्कृष्ट प्रतिमा साकारली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ही कलाकृती सर्व सामान्य नागरिकांसाठी पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. स्पर्शरंग कला परिवाराने साकारलेल्या या भव्य कलाकृतीतून शहीद जवानांना वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.
'थेट अतिरेक्यांच्या अंगावरच गाडी घातली' मारुती फड यांनी सांगितला 26/11 चा थरारक अनुभव,video
ही प्रतिमा तयार करण्यासाठी विपुल मिरजकर, नागेश खराडे, शुभम सब्बंन,प्रमोद वडणाल ,पवन मारता, सुरज गादास , सुजाता हिरेमठ ,सुप्रिया बिराजदार, वैष्णवी कोडलहंगरंगा , वैष्णवी चराटे , गीतेश्वरी गोली आर्यन चव्हाण , वरद महेंद्रकर आदींनी परिश्रम घेतले.
Video : 26/11 च्या रात्री काय घडलं? हल्ल्यात जखमी झालेल्या पत्रकारानं सांगितला थरार
विपुल मिरजकर 2008 मध्ये शाळेत असताना सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामटे यांचे पेंटिंग काढले होते. त्यावेळी त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी अशोक कामटे यांना एका कार्यक्रमात शाळेत बोलावले होते. त्यावेळी विपुल याने अशोक कामटे यांचे काढलेले पोट्रेट पेंटिंग दाखवले .त्यावेळेस अशोक कामटे यांनी त्याचे मन भरून कौतुक केले. तो क्षण त्याच्या आयुष्यात कायम अविस्मरणीय असा राहिला आहे, असं स्पर्शरंग कला परिवारचा चित्रकार विपुल मिरजकर याने यावेळी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 26/11 mumbai attack, Local18, Solapur