मुंबई, 26 नोव्हेंबर : 26 नोव्हेंबर 2008 ही तारीख कोणताही भारतीय विशेषत: मुंबईकर कधीही विसरू शकणार नाही. त्याच रात्री पाकिस्तानातील दहा दहशतवादी समुद्राच्यामार्गे भारतात घुसले. त्यांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एक कॅफे आणि नरिमन हाऊस या ठिकाणी हल्ला केला. 26/11 रोजी देशावर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याला आता 14 वर्ष झाले आहे.
या हल्ल्यात जखमी झालेले आणि प्रत्यक्ष अनुभव घेतलेले असे अनेक साक्षीदार आहेत. अशाच प्रत्यक्षदर्शींपैकी एक आहेत व्हिडीओ जर्नालिस्ट अनिल निर्मळ. दहशतवादी हल्ल्याचं चित्रीकरण करत असताना अनिल निर्मळ यांच्या बोटाला गोळी चाटून गेली होती. यावेळी 26/11 च्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले.
14 वर्षांपूर्वीची काळरात्र
अनिल निर्मळ यांना आजही त्या आठवणींनं शहारा येतो. ते सांगतात, 'तो दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. माझी शिफ्ट संपली होती. घरी जात असताना ऑफिस वरून कॉल आला की, या याठिकाणी गँगवॉर सारखं काही तरी सुरू आहे तुम्ही पोहचा.' अनिल हे ऑफिसवरून कॅमेरा घेऊन मेट्रो सिनेमाच्या दिशेने निघाले. मेट्रो सिनेमाच्या जवळ मोठ्या प्रमाणात फटाके फुटतात तसा आवाज येत होता.
26/11 attack : मुंबईसाठी काळा दिवस! हादरली होती गजबजलेली मुंबापुरी, 13 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?
अनिल यांनी एका डिव्हायडरच्या मागे लपून आपलं काम सुरू केलं पण तितक्यात कामा रुग्णालयाच्या इथून एक पोलिसांची व्हॅन आली आणि अचानक गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात अनिल यांच्या हाताला गोळी चाटून गेली. अनिल यांना काय झलन्हे कळायच्या आत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. त्यावेळी त्यांना काही कळत नव्हतं. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. आणि सहा महिने अनिल यांना ठीक होण्यासाठी लागले होते. अनिल यांच्या ज्या हाताला गोळी लागली होती, तो हात आजही दुखतो.
बाळासाहेबांनी दिली शबासकी
या मोठ्या धक्क्यातून सावरल्यानंतर देखील अनिल आज माध्यमांत काम करत आहेत. मात्र आजही 14 वर्षानंतर त्या घटनेच्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. या प्रकरणात आपली कोर्टात साक्ष देखील दिल्याचं अनिल सांगतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वर्षभरानंतर मला मातोश्रीवर बोलावलं. त्यांनी मला शबसासकी दिली. तो माझ्यासाठी मोठा क्षण होता, अशी आठवण अनिल यांनी सांगितली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 26/11 mumbai attack, Local18, Mumbai, On this Day