मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Maharashtra Budget : बजेटमधील घोषणांवर अंगणवाडी सेविका अद्याप नाराज, पाहा काय आहे कारण Video

Maharashtra Budget : बजेटमधील घोषणांवर अंगणवाडी सेविका अद्याप नाराज, पाहा काय आहे कारण Video

X
राज्य

राज्य सरकारनं बजेटमध्ये जाहीर केलेल्या तरतूदींवर अंगणवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारनं बजेटमध्ये जाहीर केलेल्या तरतूदींवर अंगणवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Solapur, India

  अनुराग सुतकर, प्रतिनिधी

  सोलापूर, 13 मार्च : राज्य सरकारनं मागच्या आठवड्यात जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. या बजेटमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करणार असल्याचं जाहीर केलं. सोलापूर  जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची संख्या जवळपास 6 हजार आहे. या संघटनेनं बजेटमधील निर्णयानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

  सरकारवरील नाराजी कायम

  मागील आठवड्यात राज्य कमिटीच्या मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेमुळे सोलापूर जिल्हा परिषद पुनम गेट जवळ आंदोलन अंगणवाडी सेविकांनी मागे घेतले होते. त्यावेळी मानधन वाढवून मिळेल आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांसारख्या लघुस्वरूपातील योजनांचा लाभ अंगणवाडी सेविकांना घेता येईल अशा प्रकारचे आश्वासन राज्य कमिटीच्या वतीने या अंगणवाडी सेविकांना देण्यात आले होते.

  बजेटमधील घोषणांवर शेतकरी खूश, पण... सरकारकडं केली महत्त्वाची मागणी! Video

  त्यानंतर बजेटमध्ये करण्यात आलेली ही घोषणा म्हणजे महागाईच्या जमान्यात फक्त रडक्याचे डोळे पुसल्यासारखे असल्याची भावना अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली आहे. शेजारीच असणाऱ्या कर्नाटक राज्यामध्ये जवळपास 11000 इतके मानधन असून येत्या काळात तेही मानधन वाढवण्याचा कर्नाटक सरकार विचार करत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शन तर सोडाच परंतु आम्हाला निदान महिना 15000 रुपये मानधन वाढवून मिळेल अशी अशा होती. पण, सरकारने आम्हाला नुसतेच आश्वासन दिले परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच केले नाही, असे मत अंगणवाडी सेविका पतसंस्थेचे सेक्रेटरी कांचन पांढरे यांनी व्यक्त केले.

  Maharashtra Budget : सोलापूर विद्यापीठाला अभिमत दर्जा, विद्यार्थ्यांना काय होणार फायदा?

   काय आहे निर्णय ?

  - अंगणवाडी सेविकांचे चालू मानधन हे 8325 इतके होते आता ते 10000 रुपये करण्यात आले आहे. म्हणजे 1675 रुपयांचे वाढ करण्यात आले आहे.

  - अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4425 वरून 5500 करण्यात आले जवळपास 1075 रुपये यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

  - तसेच येत्या काळात अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची वीस हजार पदे भरण्यात येणार आहेत.

  First published:

  Tags: Local18, Maharashtra Budget 2023-24, Solapur