अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर 10 मार्च : वेगवेगळ्या परीक्षेच्या संदर्भातील वेळखाऊ नियोजनासाठी सोलापूरच्या विद्यापीठाचं नाव नेहमी चर्चेत असतं. राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या विद्यापाठाची चांगल्या कारणांमुळे चर्चा होत आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी 55 कोटी रुपयांच्या तरतूदीची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर हे विद्यापीठ अभिमत विद्यापीठ म्हणूनही गोषित करण्यात आलं आहे.
काय होणार फरक?
राज्य सरकारनं अभिमत विद्यापीठाची घोषणा केल्यामुळे वेतन आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबतचे प्रश्न आता विद्यापीठ पातळीवर सोडवले जाणार आहेत. त्याचबरोबर कुलगुरूंना आता अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे परीक्षांचे निकाल आणि नियोजन व्यवस्थित होईल आणि प्रशासकीय कामात सुधारणा होईल, अशी आशा विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीय.
MPSC Success Story : शेतकऱ्याची लेक आली राज्यात दुसरी! यशाची प्रेरणा सांगताना म्हणाली...Video
- सर्वसामान्यपणे काही विद्यापीठे कायदा करून नंतर स्थापन केली जातात. काही विद्यापीठांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत केंद्र सरकारकडून दर्जा देण्यात येतो. त्याला अभिमत विद्यापीठ असं म्हंटलं जातं.
- विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार ऍक्ट 1956 कलम तीन या अन्वये शिक्षण क्षेत्रातील उच्च पातळीवर काम करणाऱ्या विद्यापीठांना हा अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला जातो.
- अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यामुळे आता अकॅडमिक स्टेटस ही सुविधा मिळणार आहे. विविध कोर्सेस, सिल्याबस आणि ऍडमिशन फी निश्चित करण्याचे स्वातंत्र्य आता सरकारच्या अंतर्गत राहून विद्यापीठाला मिळेल.
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नवे उपक्रम विद्यापीठाला आता व्यापक स्वरूपात येतील.
- शासकीय व्यवस्थेतील अनेक शिक्षण प्रणालींचा वापर विद्यापीठ प्रशासन करु शकते.
ही विद्यापीठाच्या संदर्भात सर्वात आनंदाची गोष्ट आहे.विद्यापीठ विकासाला यामुळे चालना मिळणार असून त्याचा सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फायदा होईल,असा विश्वास कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Education, Local18, Maharashtra Budget 2023-24, Solapur