मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Maharashtra Budget : बजेटमधील घोषणांवर शेतकरी खूश, पण... सरकारकडं केली महत्त्वाची मागणी! Video

Maharashtra Budget : बजेटमधील घोषणांवर शेतकरी खूश, पण... सरकारकडं केली महत्त्वाची मागणी! Video

X
शेतकऱ्यांना

शेतकऱ्यांना आता किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्य सरकार देखील 6 हजार रुपये देणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी भरावी लागणारी रक्कम देखील आता राज्य सरकार भरणार आहे.

शेतकऱ्यांना आता किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्य सरकार देखील 6 हजार रुपये देणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी भरावी लागणारी रक्कम देखील आता राज्य सरकार भरणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalna, India

    नारायण काळे, प्रतिनिधी

    जालना, 11 मार्च : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प नुकताच सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. यात शेतकऱ्यांसाठी देखील काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना आता किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्य सरकार देखील 6 हजार रुपये देणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी भरावी लागणारी रक्कम देखील आता राज्य सरकार भरणार आहे. सरकारने केलेल्या या घोषणांवर शेतकऱ्यांना काय वाटतं पाहुयात.

    शेतकऱ्यांना फायदा होणार

    प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारने भर टाकली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत राज्य सरकार प्रतीवर्ष प्रत्येक शेतकऱ्याला 6 हजार रुपये देणार आहे. केंद्राचे 6 हजार आणि राज्याचे 6 हजार असे मिळून शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत. याचा फायदा 1.15 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे, यासाठी 6,900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे.

    1 रुपयामध्ये पीक विमा मिळणार

    राज्यातील शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणार आहे. आधीच्या योजनेत विमा हफ्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात होती, आता शेतकऱ्यांवर कोणताच भार पडणार नाही. राज्य सरकार आता हा हफ्ता भरणार आहे. शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरायचा आहे, या योजनमुळे राज्य सरकारला 3,312 कोटींचा भार पडणार आहे.

    सानुग्रह अनुदान दिले जाईल

    2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिला. 12.84 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,683 कोटी रुपये थेट जमा केले आहेत. अपघातग्रस्त शेतकऱ्यांना 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाईल.

    Success Story : कोरोना काळात दाखवलं धाडस, विसाव्या वर्षीच तरुण बनला लखपती! Video

    पिकाला भाव द्यावा

    शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणावर शेतकरी खुश असून त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, पिकाला योग्य दर मिळाल्यास सरकारी मदतीवर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे पिकाला भाव द्यावा अशी मागणी हरिभाऊ कोरडे यांनी केली आहे.

    घेतलेले निर्णय चांगले 

    शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेले निर्णय चांगले आहेत. केंद्र सरकार 6 हजार देत होते त्यात राज्य सरकारचे 6 असे वर्षाचे 12 हजार आता मिळतील. पण या बरोबर महागाई वाढली त्याप्रमाणे मालाला भाव द्यायला पाहिजे असे पीर कल्याण येथील शेतकरी भागवत शिंदे यांनी म्हंटले आहे.

    घोषणेचे मी स्वागत करतो

    अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात पीक विमा काढता येणार असल्याच्या घोषणेचे मी स्वागत करतो. यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. फक्त ही योजना शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहचेल याची खबरदारी सरकारने घ्यावी, असं शेलुद येथील शेतकरी निलेश चौधरी यांनी सांगितले.

    First published:

    Tags: Jalna, Local18, Maharashtra Budget 2023-24