सोलापूर 4 जुलै : सध्या जुलै महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. हा महिना आपल्यासाठी कसा असेल हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण राशीचक्रावर आपल्या कुंडलीतील भविष्य पाहत असतात. कुंभ राशीच्या मंडळींसाठी जुलै महिना कसा असेल? ग्रहांच्या हालचाली काय सांगतात? याबाबतच सोलापूरचे ज्योतिषाचार्य विद्याधर मुरलीधर गवई यांनी यांनी माहिती दिली आहे. माणसातली माणुसकी जपणारी राशी कुंभ आकरा शनीच्या आधिपत्याखाली येणारी राशी असून याचे प्रतीक हातात घट घेतलेला पुरुष आहे. या राशीत कुशाग्र बुद्धिमत्ता, अचाट स्मरणशक्ती असल्याने वाचन चिंतन यांची आवड असते. सिद्धीचा वरदहस्त, उत्कृष्ट चिकाटी असल्याने ही रास मानवी जीवनाचा खराखुरा आविष्कार आहे. स्वत:हून कोणाला त्रास देणार नाही, मात्र कोणी त्रास दिल्यास बौद्धिक चतुराईने त्याला गप्प करणे सहज जमते. माणसातली माणुसकी जपणारी, नि:स्वार्थपणे काम करणारी अशी ही राशी आहे.
रस्त्याने एखादा अपघात दिसल्यास हातातील काम सोडून मदतीस धावणारी या राशीतील लोक असतात. या राशीस गूढशास्त्र, मानसशास्त्र, काव्य यांची आवड असल्याने अनेक कवी, योगी या राशीचे असतात. आधुनिक विज्ञानाशी यांचे चांगलेच नाते जोडलेले असते. कुंभ राशीचे लोक विज्ञानात जेवढे रस घेतात तेवढाच रस त्यांना आध्यात्मातही असतो, असं ज्योतिषाचार्य विद्याधर मुरलीधर गवई सांगतात. मोठा योग येणार निरपेक्ष आणि नि:स्वार्थपणे काम करण्याची सवय असल्याने एक समतोल व्यक्तिमत्त्व यात पाहायला मिळते. खाण्यासाठी जगायचे हे तत्त्वज्ञान यांच्या विचारात बसत नाही, वाट्टेल ते खाणे यांना जमत नाही. साधा आणि नेमका आहार यांना प्रिय असतो. फिरायला गेल्यावर सहज भेळेची गाडी दिसली म्हणून भेळ खाणे या राशीला शक्यतो जमत नाही.
Shukra Gochar 2023 : चार मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, पाहा कुणाला होणार फायदा?
कुंभ राशीची व्यक्ती पोटाची भूक भागवण्यापेक्षा बौद्धिक भूक भागवणे सहन करतो. पिता आणि आई म्हणून या राशीच्या व्यक्ती दोन्ही जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे निभावते. या राशीच्या लोकांना ऐहिक जीवनात अनासक्ती असते. कदाचित त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात कलह होऊ शकतो. या राशीचा अधिपती शनी असल्याने निराशावाद हा यांचा स्थायीभाव असतो. कुंभ राशीच्या व्यक्तीस एखाद्या कामात अपयश असल्यास त्या लगेच निराश होतात आणि आपला आत्मविश्वास गमावून बसतात. त्याचाच परिणाम म्हणून पुढील निर्णय घेताना बऱ्याचदा चुका होतात. काटकसरी स्वभाव असल्याने कधी कधी त्याची परिणती कंजूषपणात होते. मागील वर्षांपासून कुंभ राशीतील लोकांना मागे साडेसाती लागली आहे. परंतु येणाऱ्या काळात त्यांची शनीची दिशा बदलून येत्या अडीच वर्षात त्यांना मोठा योग येणार आहे. शिवाय इथून पुढे त्यांच्या मागे असणारे अपयश हे कमी कमी होत जाऊन अडीच वर्षात चांगला योग त्यांच्या पदरी पडणार आहे, असं ज्योतिषाचार्य विद्याधर मुरलीधर गवई सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)