अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर, 17 मार्च : औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर येथे दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आय. टी. आय. उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित केला. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व आस्थापना व आयटीआय उत्तीर्ण व अंतिम वर्ष परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.
शिकाऊ उमेदवारी अधिनियमन 1961 अंतर्गत हा शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अप्रेंटीसशीप मेळाव्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व आस्थापना आणि आयटीआय उत्तीर्ण तसेच अंतिम वर्षातील परीक्षा दिलेलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहून या मेळाव्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच, ज्या आस्थापनांमध्ये अद्याप शिकाऊ उमेदवारी योजना लागू केली नाही, तसेच ज्या आस्थापनांना शिकाऊ उमेदवार भरती करावयाची आहे, अशा सर्व आस्थापनांतील प्रतिनिधींनी ॲप्रेंटिस ट्रेनिंग विभागास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Beed News : विमानात कधीही न बसलेला जिल्हा परिषदेचा विद्यार्थी करणार नासासाठी उड्डाण! Video
अधिक माहितीसाठी संपर्क
अधिक माहितीसाठी 0217-2731040/41 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. diosur@gmail.com डॉक्युमेंट विषयी काही समस्या असेल तर या ईमेलवर आपले डॉक्युमेंट फॉरवर्ड करावेत.
10 वी पास तरुणांना मिळेल महावितरणमध्ये नोकरी! 'या' पद्धतीनं करा लगेच अर्ज
दरम्यान, राज्यात 417 इतक्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून या संस्थांमध्ये जवळपास 134 प्रकारचे व्यावसायिक ट्रेड उपलब्ध आहेत. सोलापुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून साधारणपणे दरवर्षी 380 विद्यार्थी हे आपले शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात. त्यामध्ये वेल्डर, पेंटर, कारपेंटर ,ड्राफ्ट्समन मेकॅनिक, डिझेल मेकॅनिकल, वायरिंग आदीट्रेडचा समावेश असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Local18, Solapur