नारायण काळे, प्रतिनिधी
जालना, 16 मार्च : दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत नोकरी करता येणार आहे. महावितरण जालनामध्ये तब्बल 70 पदांसाठी भरती होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च ही आहे. यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
कोणती पदे भरणार?
जालना महावितरणमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणजे अप्रेंटिसची पदे भरली जाणार आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. एकूण 70 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 6000/- ते 7000/- रुपये एवढे दरमाह वेतनमान देण्यात येणार आहे.
कसा करायचा अर्ज
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 30 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Navy Recruitment: भारतीय नौदलात अधिकारी पदावर बंपर भरतीची घोषणा; पात्र असाल तर करा अप्लाय
इथे करा अर्ज
https://www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर जाऊन इच्छुक अर्ज करू शकतात. ऑनलाईन फॉर्म ओपन झाल्यानंतर फॉर्म मध्ये दिलेली आवश्यक कागदपत्रे सादर करून फॉर्म भरायचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jalna, Local18