सोलापूर, 27 जानेवारी : अभिनेता शाहरुख खानचा पठाण हा सिनेमा 25 जानेवारीला मोठ्या धुमधडाक्यात संपूर्ण देशात रिलीज झाला आहे. मात्र, पठाण रिलीज होताच मराठी सिनेमांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोलापुरात हिंदू संघटना पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनावरून आक्रमक झाल्या आहेत. याठिकाणी पठाण चित्रपटाचे बॅनरही फाडण्यात आले.
सोलापुरात हिंदुराष्ट्र सेना आणि बजरंग दलाने पठाण चित्रपटादरम्यान चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी करत चित्रपटाला विरोध केला. तसेच चित्रपटाचे पोस्टर फाडले. पठाण चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी करत चित्रपटगृह बंद पाडण्याचा प्रयत्न याठिकाणी करण्यात आला.
दरम्यान, यानंतर पोलिसांनी हिंदूराष्ट्र सेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सोलापुरातील उमा चित्रपट गृहाच्या बाहेर हा प्रकार घडला. याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हा चित्रपट रिलीजपूर्वीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या 'बेशरम रंग' या गाण्यावरुन हा वाद निर्माण झाला होता. त्यावरुन देशात अनेकांनी यासंदर्भात टीका केली होती.
हेही वाचा - 'नाहीतर आम्ही मल्टिप्लेक्सचेच 'बांबू' लावू'; पठाण रिलीज होताच मनसेचा इशारा
सिनेमाच्या फर्स्ट लुकनंतर सिनेमाबद्दल उत्सुकता आणखी वाढली होती. मात्र त्यानंतर आलेल्या गाण्यांनी मात्र नवा वादंग निर्माण झाला आहे. पठाणमधील बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या बिकिनीनं देशभरातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं. सिनेमाचा वाद सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेश ( CBFC) पर्यंत पोहोचला. त्यांनी सिनेमातील गाण्यांमध्ये महत्त्वाचे बदल करण्याचे आदेश दिले. सिनेमातील काही सीन्स तात्काळ काढून टाकून त्यानंतर सिनेमा प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आता पठाण सिनेमातील बेशरम रंग या गाण्यात बदल करण्यात आलेत आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Movie release, Solapur