मुंबई, 5 जानेवारी- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा बहुचर्चित 'पठाण' हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातबाबत दररोज नवनवीन वृत्त समोर येत आहेत. त्यामुळे पठाणच्या मेकर्स समोरील अडचणी आणखी वाढत आहेत. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं रिलीज झाल्यापासूनच काही ठिकाणी त्याला कडाडून विरोध केला जात आहे. या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या कपड्यांवर आक्षेप घेण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर या सर्व प्रकरणात दोन गट पडलेले दिसून येत आहेत. यामध्ये काहींनी पठणला समर्थन दिलं आहे तर काहींनी जोरदार विरोध केला आहे. अशातच आता 'पठाण' विरोधात बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत.
'पठाण' ला सुरुवातीपासूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान हा चित्रपट रिलीज न करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. अशातच आता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते एका मॉलमध्ये पठाणला कडाडून विरोध करताना दिसून येत आहेत. त्यामुळे पठाणच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून येत आहे.
(हे वाचा:Pathaan: विवादात अडकलेल्या 'पठाण' चा ट्रेलर लीक; मेकर्सना मोठा फटका, VIDEO होतोय VIRAL )
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अहमदाबाद येथील एल्फा मॉलमधील आहे. यामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत तोडफोड केलेली दिसून येत आहे. इतकंच नव्हे तर कार्यकर्त्यांनी चित्रपटाला विरोध दर्शवत अभिनेता शाहरुख खानचे पोस्टरसुद्धा फाडले आहेत. त्यामुळे चित्रपटाबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही असं चित्रपटाच्या विरोधकांनी म्हटलं आहे. त्यामुळे शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा पठाण रिलीजपूर्वीच चर्चेत आला आहे.
Hindu community protest in india against @iamsrk' movie "Pathan" just because @deepikapadukone wore the "Kesari" colour bikini in the song #BesharamRang .#Pathaan #PathanDekhegaHindustan #ShahRukhKhan #DeepikaPadukone pic.twitter.com/VZGfLs4I5D
— Qaisar Butt (@Qaisar_1) January 4, 2023
दीपिका पादुकोणच्या बिकिनीवर आक्षेप-
काही दिवसांपूर्वी 'पठाण' या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. या कलाकारांच्या चाहत्यांना हे गाणं पसंत पडलं असलं, तरी काही लोकांनी या गाण्यावर आक्षेप घेत कडाडून विरोध केला आहे. गाण्यामध्ये दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे आमच्या भावना दुखावल्याचा आरोप ठिकठिकाणी करण्यात येत आहे. त्यामुळे हा सर्व वाद सुरु झाला होता. हे प्रकरण सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आलं होतं. यावेळी सेन्सॉर कमिटीने गाण्यात बदल करुन रिलीज करण्याचा आदेश दिला आहे.
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर येत्या 10 जानेवारीला रिलीज करण्यात येणार आहे. यामधील शाहरुख खानचा लूक प्रचंड चर्चेत आला आहे. हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Deepika padukone, Entertainment, Shahrukh khan