मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी काय करावं? आयुर्वेदात दिलाय महत्त्वाचा सल्ला, पाहा Video

उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी काय करावं? आयुर्वेदात दिलाय महत्त्वाचा सल्ला, पाहा Video

X
मार्च

मार्च महिना सुरू होताच राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाळ्यात तब्येतीची काळजी घेण्याच्या काही टिप्स आयुर्वेदात दिल्या आहेत.

मार्च महिना सुरू होताच राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाळ्यात तब्येतीची काळजी घेण्याच्या काही टिप्स आयुर्वेदात दिल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

    अनुराग सुतकर, प्रतिनिधी

    सोलापूर, 21 मार्च : मार्च महिना सुरू होताच राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. पुढील दोन महिने सर्वत्र कडक उन्हाळा असणार आहे. उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेणं आवश्यक आहे. यामध्ये योग्यप्रकारच्या आहाराचाही समावेश आहे. प्रत्येक ऋतूनुसार आपण आहार केला तर रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते, असं आयुर्वेदानं हजारो वर्षांपूर्वी सांगितलं आहे.

    सोलापूरचे प्रसिद्ध वैद्य डॉ. सतीश परशुरामी यांनी उन्हाळ्यात आहार कसा असावा याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. उन्हाळा सुरू झाला आणि लागलीच आपण फ्रीजमधील थंड पाणी किंवा शीतपेये  पिण्याकडं आपला कल असतो.

    सर्वात जास्त उष्ण गुणधर्म असणारी ही शीतपेय शरीरासाठी अधिक धोकादायक आहेत. परंतु, सर्वसामान्यांमध्ये तहान  भागवण्यासाठी  फ्रिजमधील बॉटल्स आणि त्यातील पाणी पिण्याकडे अधिक कल असतो. या सर्व गोष्टी  शरीराला हानिकारक  आहे, असा इशारा त्यांनी दिलाय.

    आयोडीन शरीरासाठी का असते आवश्यक? हे 5 पदार्थ दूर करतील आयोडीनची कमतरता

    पित्त वाढू नये म्हणून काय कराल?

    - खडीसाखर घालून ते पाणी पिणे.

    - माठातील पाणी पिणे.

    - वाळा घातलेलं पाणी प्यावे.

    - कैरीचं पन्ह हे कोणत्याही प्रकारचा पित्ताचा किंवा उष्णता वाढीचा त्रासावर उपायकारक आहे

    -   या दिवसांमध्ये जेवणात गोड पदार्थ थोडे जास्त खावेक.

    - शक्य तितका मांसाहार टाळायला पाहिजे.

    - तिखट आणि मिठाचे प्रमाण अत्यल्प कमी केले पाहिजे.

    - प्रत्येकानं ताक पिणे आवश्यक आहे.

    काय काळजी घ्यावी?

    -  शक्य होईल तितकं उन्हामध्ये जाणे टाळावे.

    - उन्हामध्ये जाण्याचा प्रसंग आला तर डोक्यावर टोपी किंवा काहीतरी अच्छादन असणे आवश्यक आहे. कानामध्ये कापूस घालावा.

    - पांढरा कांदा हा खिशामध्ये ठेवावा किंवा त्याच्या चकत्या करून डोक्यावर ठेवून त्यावर आच्छादन लावावे. त्यामुळे उष्णतेपासून डोक्याचं संरक्षण होईल.

    उन्हाळ्यात दही खाताना 'या' चुका टाळा, नाहीतर पडेल महागात

    प्रत्येक आजारांसाठी आयुर्वेद हे जितके कार्यक्षम आहे त्याच्याही पेक्षा जास्त हे रोग होऊच नये यासाठी काळजी घेणं सुद्धा आयुर्वेद शास्त्र सर्वसामान्यांनी समजून घेतलं पाहिजे.बर्फ किंवा आईस्क्रीम म्हणून आपण ज्या गोष्टी थंड आहेत म्हणून खातो परंतु ते सर्वात जास्त उष्ण गुणधर्मात मोडतात.त्यामुळे असे पदार्थ खाणे शक्यतो या उन्हाळ्याच्या दिवसात टाळावेत जेणेकरून पित्त ,कफ आणि वात यांसारखे आजार उद्भवणार नाहीत,असं डॉ.परशुरामी यांनी सांगितले आहे.

    टीप :येथे दिलेली माहितीची अंमलबजावणी करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

    First published:
    top videos

      Tags: Ayurved, Health Tips, Local18, Solapur