मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Solapur : उसळ नसलेल्या मिसळीचा घ्या स्वाद, काळ्या तिखटाची चव आहे खास video

Solapur : उसळ नसलेल्या मिसळीचा घ्या स्वाद, काळ्या तिखटाची चव आहे खास video

X
सोलापूर

सोलापूर शहरात उसळ नसलेली काळ्या तिखटातील मिसळ खायला दिले जाते.

सोलापूर शहरात उसळ नसलेली काळ्या तिखटातील मिसळ खायला दिले जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur [Sholapur], India

सोलापूर, 19 नोव्हेंबर : मिसळ पाव हे महाराष्ट्रातील खूप लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. मिसळ पाव म्हंटले की आठवतो तरी रस्सा, उसळ, झणझणीत ग्रेव्ही, फरसाण आणि पाव. मात्र, सोलापुरात मिसळ ही सोलापूर पद्धतीनेच बनवली जातेती म्हणजे सोलापूरच्या स्पेशल अशा काळ्या तिखटात. सोलापूर शहरातील पवन कुमार स्नॅक्स सेंटर येथे ही मिसळ बनवली जाते. या मिसळचे वैशिष्ट्य म्हणजे या मिसळ भाजी मध्ये कोणत्याही प्रकारची उसळ टाकली जात नाही. 

मुंबई ,पुणे, सातारा, सांगली किंवा कोल्हापूर या ठिकाणी मिसळ म्हंटले की उसळ असलेली ग्रेव्ही खवय्यांना सर्व्ह करून देतात. मात्र, सोलापूर शहरातील पवन कुमार स्नॅक्स सेंटर येथे उसळ नसलेली काळ्या तिखटातील मिसळ खायला दिले जाते. त्यामुळे या झणझणीत मिसळीचे खवय्ये दिवाने आहेत. त्यामुळे ही उसळ नसलेली मिसळ खाण्यासाठी खवय्ये नेहमीच गर्दी करतात.

Solapur : हैदराबादी मिरचीचे स्पेशल आंध्र भजी, एकदा खाल तर पुन्हा मागाल, Video

बाकीच्या मिसळ मध्ये प्रामुख्याने उसळ असते. परंतु, आपल्या मिसळीमध्ये सोलापूरच्या काळ्या तिखटाचा आणि मसाल्याचा वापर करून बनवलेली विशिष्ट ग्रेव्ही असते. मुळात सोलापूरकरांच्या जिभेला तिखटच चालतं. म्हणून त्याच स्वरूपातील ही ग्रेव्ही आम्ही बनवली आहे आणि आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे यामध्ये इतर मिसळींप्रमाणे खारी बुंदी किंवा शेव नसते तर, आम्ही स्वतः पालक शेव, मसाला शेव, पापड, काटी शेव यापासून बनवलेलं फरसाण खवय्यांना देत असतो. हे फरसाण आम्ही स्वतः बनवतो, असं  पवन कुमार स्नॅक्स सेंटरचे मालक नीरज जमगे सांगतात.

मिसळीची किंमत किती आहे? 

मिसळ पाव थाळीमिसळपाव ,चीज मिसळ पाव ,तिखट मिसळ पाव इत्यादी प्रकारच्या मिसळ पवन कुमार स्नॅक्स सेंटर येथे मिळतात. साधी मिसळ ही 60 रुपये पर्यंत मिळतेतर चीज मिसळ ही 80 रुपयाला स्पेशल आणि स्पेशल असणारी मिसळपाव थाळी ही 130 रुपयाला मिळते

Nashik : झणझणीत मिसळसह खा भजे, नाशिकमध्ये मिळतंय भन्नाट कॉम्बिनेशन, Video

सोलापूर स्टाईल मध्ये ही मिसळ बनवलेली असून ही मिसळ खाण्यासाठी मी नेहमी येत असतो. ही मिसळ खाण्यासाठी चांगली आहे, असं खवय्ये अनिकेत निंबाळकर याने सांगितले. 

गुगल मॅपवरून साभार

कुठे मिळते उसळ नसलेली मिसळ?

 जुले सोलापूर रोड, जुने संतोष नगर, कोणार्क नगर, जुळे, सोलापूर, महाराष्ट्र 41300

संपर्क : - निरज जमगे 9168832009

 

 

First published:

Tags: Local18, Local18 food, Solapur