नाशिक, 24 ऑक्टोंबर : नाशिक हे खवय्यांचे माहेरघर झाले आहे. शहरातील गल्लोगल्लीत वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. या पदार्थामध्ये
नाशिक
ची मिसळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तुम्हाला एक नाही तर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मिसळ नाशिक शहरात गल्लोगल्ली खायला मिळतात. त्यातील एक फेमस मिसळ म्हणजे श्री सोमनाथ स्पेशल अस्सल घरगुती लाल मसाल्याची झणझणीत मिसळ. ही मिसळ एकदा खाल्ली की तुम्हाला पुन्हा खाविसी वाटेल अगदी स्वादिष्ट आणि चमचमीत ही मिसळ आहे. 33 वर्षांपूर्वी झाली मिसळची सुरुवात 33 वर्षांपूर्वी सोमनाथ बागुल यांनी नाशिक शहरातील मुंबई नाक्यावर श्री सोमनाथ स्पेशल अस्सल घरगुती लाल मसाल्याची मिसळ सुरू केली. कारण मुंबई नाका म्हणजे वर्दळीच ठिकाण या ठिकाणी चालक वाहक तसेच इतर प्रवाशांचा नेहमीच राबता असतो. त्यामुळे सोमनाथ बागुल यांनी सर्वसामान्य लोकांना परवडेल या दरात चांगल्या दर्जाची मिसळ सुरू केली होती. तेव्हापासून तर आतापर्यंत या मिसळला खवय्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे. आताच्या घडीला सोमनाथ बागुल यांचा मुलगा संदीप बागुल मिसळचं हे छोटेखानी हॉटेल सांभाळतो. हेही वाचा :
Nashik : भारीच! एकाच हॉटेलमध्ये मिळतात 13 प्रकारचे कढई पोहे, पाहा Video मिसळमध्ये वापरले जाणारे मसाले हे घरीच तयार करतात या मिसळमध्ये वापरले जाणारे मसाले हे घरीच तयार केले जातात. ते ही अगदी घरगुती पाट्यावर वाटून तयार केले जातात. त्यामध्ये कोणतेही इतर पदार्थ भेसळ केले जात नाहीत. मिसळमध्ये भजे दिले जातात. ती चांगल्या दर्जाची असतात त्यामुळे मिसळची चव अजून वाढते. 33 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मिसळची चव आणि आजच्या मिसळची चव सारखीच आहे. कारण आम्ही ग्राहकांचं हित लक्षात घेतो त्यांना आवडतील त्या गोष्टी आम्ही देतो. त्यामुळे आमच्याकडे खवय्यांचा कल जास्त असतो, असं हॉटेलचे मालक संदीप बागुल सांगतात. मिसळची खास वैशिष्टय नाशिक शहरात अनेक ठिकाणी मिसळ मिळतात. त्यामुळे खवय्यांच्या पसंतीस उतरण्यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रयोग करतात. मात्र, या मिसळचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे मिसळमध्ये घरगुती लाल मसाला वापरला जातो आणि भजी टाकली जातात. यामुळे मिसळला चांगली चव येते. चमचमीत मिसळ बनते आणि खवय्ये ही अगदी पोटभर मिसळ खातात. हेही वाचा :
Nashik : नाशिकमध्ये खा अस्सल लोणी स्पंज डोसा, इंजिनिअर तरुणाचा नवा उद्योग, Video
या मिसळणे पोटाचा त्रास होत नाही मिसळमध्ये मसाले वापरले जातात तर्री असते त्यामुळे खवय्यांना पोटाचा त्रास होण्याची देखील शक्यता असते. मात्र, ही मिसळ खाल्ल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. विशेष म्हणजे चांगल्या दर्जाचे साहित्य वापरले जाते. खवय्ये हेच आपले मायबाप समजून मिसळ बनवली जाते. मिसळ बनवताना कोणतीही काटकसर केली जात नाही. गेल्या 20 वर्षांपासून या मिसळची चव आम्ही चाखतोय. पण आज ही हीच मिसळ आमच्यासाठी भारी आहे, असं खवय्ये हेमंत काळमेख सांगतात.
कुठे आहे श्री सोमनाथ मिसळ? नाशिक शहरातील मुंबई नाक्यावर मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या समोर ही मिसळ आहे. श्री सोमनाथ स्पेशल घरगुती लाल मसाल्याची मिसळ मिसळची सुरुवात करतानाच सोमनाथ बागुल यांनी सर्व सामान्य माणसांचा विचार केला होता. त्यानां परवडेल या दरात मिसळ दिली जाईल आणि आज ही या मिसळचे दर खूप काही वाढवले नाहीयेत. 70 रुपयात ही मिसळ दिली जाते. त्यात दोन पाव, मिसळ, पापड, दही, भजी, कांदा, लिंबू , शेव दिली जाते. कारण सर्वसामान्य ग्राहक वर्ग या ठिकाणी जास्त येतो. मिसळ खाण्याची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. एस.टी कर्मचाऱ्यांसाठी फक्त 50 रुपयात मिसळ मिसळच्या शेजारीच मध्यवर्ती बसस्थानक असल्यामुळे इथे एस.टी कर्मचारी चालक वाहक मिसळ खाण्यासाठी जास्त येतात. चालक वाहकांना परवडलं पाहिजे दररोजचा त्यांचा खर्च बघता त्यांच्यासाठी फक्त 50 रुपयात मिसळ दिली जाते. ते आपला डब्बा घेऊन या ठिकाणी येतात आणि मस्त जेवण करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.