मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, किटकनाशकांपासून संरक्षण करणारी नवीन सिस्टीम तयार, Video

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, किटकनाशकांपासून संरक्षण करणारी नवीन सिस्टीम तयार, Video

X
सोलापुरातील

सोलापुरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सक्षम पक्षी आणि किटकनाशकांपासून संरक्षण करणारी सिस्टीम तयार केली आहे.

सोलापुरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सक्षम पक्षी आणि किटकनाशकांपासून संरक्षण करणारी सिस्टीम तयार केली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Solapur [Sholapur], India

सोलापूर,28 नोव्हेंबर : समस्याचे निराकरण करीत त्यावर उपाय म्हणून काही सुचवले तर तीच आयडिया बनते. याचीच प्रचिती सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथील अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली आहे. शेतीच्या समस्यावर आपल्या बुद्धिमत्तेची जोड देऊन त्यावर उपाय काढत ॲनिमल बर्ड अँड इन्सेक्स्ट रिप्लांट सिस्टीम त्यांनी तयार केली आहे. सक्षम पक्षी आणि किटकनाशकांपासून संरक्षण करणारी ही सिस्टीम असून या सिस्टीमला आकृती 2022 या स्पर्धेचे विजेतेपद मिळाले आहे.

कोरोना काळात सुबोध शिलवंत याच्या वडिलांना हवामानातील बदलांमुळे शेती करण्यामध्ये नाहक त्रास सहन करावा लागत होता. किटकनाशके आणि बदलत्या हवामान या दोन्ही गोष्टींचा त्यांच्या पिकांवर दुष्परिणाम होऊन उत्पादन कमी निघत होते. त्यावर उपाय करण्यासाठी निरंजन यंगलदास, सुबोध शिलवंत, संगमेश्वर कानडे आणि पंकज हंचाटे या अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या सर्व वर्ग मित्रांनी एकत्र येण्याचे ठरवले आणि ॲनिमल बर्ड अँड इन्सेक्स्ट रिप्लांट सिस्टीम म्हणजेच सक्षम पक्षी आणि किटकनाशकांपासून संरक्षण करणारी एक सिस्टीम त्यांनी उद्ययास आणली.

Beed : रेशीम शेती ठरली वरदान, एका एकरात मिळालं लाखोंचं उत्पन्न

तिचे मेकॅनिझम एवढे स्ट्रॉंग बनवले होते की ती सिस्टीम व्यवस्थित काम करू लागली. दरवर्षी युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या संस्थेच्या अंतर्गत सर्व महाविद्यालय पातळीवर अभियांत्रिकी, सामाजिक शास्त्र, मॅनेजमेंट आणि शेती विषयक विभागामधून आकृती ही स्पर्धा घेतली जाते. त्यामध्ये तुम्ही स्वतः तयार केलेले तंत्रज्ञान प्रात्यक्षिकद्वारे सादर करून दाखवायचे असते.

या स्पर्धेमध्ये यंदाच्या वेळी नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सोलापूर येथील अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ॲनिमल बर्ड अँड इन्सेक्स्ट रिप्लांट सिस्टीम प्रात्यक्षिकद्वारे सादर करून दाखवले. त्यामध्ये त्यांची टीम किसान विजयी झाली असून त्यांना बक्षीस स्वरूपात 1 लाख रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. या स्पर्धेमध्ये 302 महाविद्यालय होते. त्यामध्ये 23 वेगवेगळ्या राज्यातील 5038 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होताटीम किसान मित्र यांना ही सिस्टीम बनवण्यासाठी नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राध्यापक डॉश्रीनिवास मेतन यांनी प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका बजावली.

किती आहे या सिस्टीमची किंमत ?

टीम किसान मित्र यांना ही सिस्टीम बनवण्यासाठी सुमारे 40 हजार रुपये इतका खर्च आला आहे. सोलार एनर्जीचा वापर करीत ही मशीन बनवल्याने त्यावर सरकारी सबसिडी वजा करून त्याची किंमत ही 24 हजार रुपये इतकी आहे

Video: शेतकऱ्यांनो, करू नका लहरी निसर्गाची काळजी, खेती ज्योतिष देणार सर्व माहिती!

 कशी काम करते ही सिस्टीम?

शेतजमिनीशी संबंधित सर्व पॅरामीटर जसे की तापमान, आद्रता आणि मातीमध्ये असणारे मोईश्चर एकत्रित गोळा केले जातात. तसेच हवामानाशी निगडित वाऱ्यांची दिशा आणि त्याचा वेग एका छोट्या मशीन मोटरद्वारे मोजला जातो आणि हे सर्व पॅरामीटर कलेक्ट करून टीम किसान मित्र यांनी तयार केलेल्या मोबाईल ॲपद्वारे संबंधित शेतकऱ्याला पाठवली जाते.

या सिस्टीममुळे शेतकऱ्यांना अवकाळी हवामानाचा अंदाज घेत आधीच पूर्वनियोजन करता येईलॲनिमल बर्ड अँड इन्सेक्स्ट रिप्लांट सिस्टीम यामध्ये पक्षांना ऐकू जाईल इतक्या अल्ट्रासोनिक साऊंड स्पीकर त्या डिवाइला बसवले आहे तर रात्री किंवा दिवसा येणारे किटकनाशके फळांवर  चिटकता त्या  डिवाइसला आकर्षित होऊन चिटकून राहतात.

 या सिस्टीम सोबत तयार केलेल्या ॲपमध्ये सर्व प्रकारच्या भाषा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना आपल्या पिकांवर कोणत्या पक्षाचा हल्ला झाला आहे आणि किटकनाशके आहेत याची सर्व माहिती मिळते.

संपर्क क्रमांक  

निरंजन यंगलदास 

 +91 87673 76452

First published:

Tags: Agriculture, Farmer, Local18, Solapur