जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तांचं भरभरून दान; यात्राकाळात समितीला मिळालं इतके कोटी उत्पन्न

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तांचं भरभरून दान; यात्राकाळात समितीला मिळालं इतके कोटी उत्पन्न

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दान

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दान

आषाढी वारीत विठुरायाच्या भक्तांनी भरभरून दिलेल्या दानामुळे मंदिर समितीला 6 कोटी 27 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 57 लाख 63 हजार रुपयांचं उत्पन्न वाढलं आहे

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

सोलापूर 09 जुलै : आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून अनेक भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. यात्राकाळात भक्तांनी विठुरायाच्या चरणी भरपूर दान दिलं आहे. आषाढी वारीत विठुरायाच्या भक्तांनी भरभरून दिलेल्या दानामुळे मंदिर समितीला 6 कोटी 27 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 57 लाख 63 हजार रुपयांचं उत्पन्न वाढलं आहे. याशिवाय लाडू प्रसाद विक्रीतून 75 लाख रुपये उत्पन्न मंदिर समितीला मिळालं आहे. या काळात विठ्ठलाच्या चरणी 45 लाख 23 हजार रुपये तर रुक्मिणी चरणी 12 लाख 69 हजार रुपये दान केले गेले आहेत. हुंडी पेटीत 1 कोटी 38 लाख रुपये जमा झाले आहेत. तर, सोने चांदीतून 30 लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे. याशिवाय देणगी पावतीद्वारे 2 कोटी 13 लाखांचं दान मंदिराच्या खजिन्यात जमा झालं आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना सेवा देण्याची संधी; अशी होणार कार्यवाही यंदाच्या वारीत 12 ते 15 लाख भाविक पंढरीत दाखल झाले होते. मंदिर समितीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यात्राकाळात यंदा 6 कोटी 27 लाख 60 हजार 227 रुपये एवढं उत्पन्न जमा झालेलं आहे. यासोबतच या काळात एसटी महामंडळालाही तब्बल 27 कोटी 88 लाखांचं उत्पन्न मिळालं आहे. आषाढी यात्रेच्या काळात अनेक भाविकांनी विठुरायाच्या भेटीसाठी जाण्याकरता लालपरीने प्रवास केला. 25 जून ते 3 जुलै या कालावधीत राज्याच्या विविध भागातून 17 हजार 500 फेऱ्या वारकऱ्यांसाठी लालपरीने केल्या. या कालावधीत तब्बल 8 लाख 81 हजार वारकऱ्यांनी एसटीने प्रवास केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात