मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking! नवरदेवाला वरमाळा घालताच भयानक घडलं; लखनऊमध्ये नवरीचा स्टेजवरच मृत्यू

Shocking! नवरदेवाला वरमाळा घालताच भयानक घडलं; लखनऊमध्ये नवरीचा स्टेजवरच मृत्यू

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

नवरदेवाला वरमाळा घातल्यानंतर खुर्चीवर बसण्यासाठी जात असलेली नवरी अचानक खाली कोसळली. मेडिकल कॉलेजमध्ये तपासणीनंतर तिला मृत घोषित करण्यात आलं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India
  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 04 डिसेंबर : लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात अतिशय खास असतो. कारण या दिवसापासूनच माणसाचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. हा वर आणि वधू दोघांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय आनंदाचा क्षण असतो. मात्र, अनेकदा लग्नात अशा काही घटना घडतात, ज्यामुळे हा आनंद क्षणात दुःखात बदलतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील मलिहाबाद येथील भदवाना गावातून समोर आली आहे. या घटनेत लग्नाच्या स्टेजवरच नवरीचा मृत्यू झाला.

हसतं-खेळतं वातावरण अचानक दुःखात बदललं. नवरदेवाला वरमाळा घातल्यानंतर खुर्चीवर बसण्यासाठी जात असलेली नवरी अचानक खाली कोसळली. मेडिक कॉलेजमध्ये तपासणीनंतर तिला मृत घोषित करण्यात आलं. याबाबत समजताच दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला. शनिवारी सकाळी या तरुणीवर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

पतीला सोडून बहिणीसोबत हनिमूनला गेली नवरी; संपूर्ण सत्य समजताच नवरदेवाची पोलिसांत धाव

भदवाना गावातील रहिवासी फर्निचर कारागीर राजपाल शर्मा यांची मुलगी शिवांगीचं लग्न लखनऊच्या बुद्धेश्वर मोहल्ला येथे राहणारा फर्निचर कारागीर विवेक याच्याशी जुळलं होतं. शुक्रवारी रात्री ही मिरवणूक भादवणा गावात पोहोचली होती. यानंतर नवरी आणि नवरदेव दोघांनाही स्टेजवर आणण्यात आलं. हसत-खेळत वरमाळेचा कार्यक्रम पार पडला.

कुटुंबातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेवाला वरमाळा घातल्यानंतर नवरी स्टेजवर ठेवण्यात आलेल्या खुर्चीवर बसू लागली. इतक्यात ती स्टेजवरच कोसळली. तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथे डॉक्टरांनी हृदयविकाराची शक्यता वर्तवत मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. जिथे नवरीला मृत घोषित करण्यात आलं.

VIDEO: एक वर अन् 2 वधू; जुळ्या बहिणींची एकाच तरुणासोबत सप्तपदी, सोलापूरकर शॉक!

शिवांगी अशावेळी झालेल्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबावर आभाळ कोसळलं. नवरीच्या अशाप्रकारे झालेल्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. गावकऱ्यांनी सांगितलं, की शिवांगी काही दिवस आजारीही होती. तिला ताप होता, हृदयासंबंधी काहीही तक्रार नव्हती. हे सगळं अचानक कसं घडलं, हे कोणालाच समजलं नाही.

अतिउत्साहात किंवा दु:खाच्या वेळी अ‍ॅड्रेनिरिल हार्मोनची जास्त प्रमाणात निर्मिती होते, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. सामान्य हृदय गती 70-100 असावी, जी 200-300 पर्यंत पोहोचते. अतिउत्साहामुळे हृदयाचं काम अचानक थांबतं. यामुळे मृत्यू 20-30 सेकंदात होतो, असं लोहिया कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. भुवन तिवारी यांनी सांगितलं.

First published:

Tags: Bride, Shocking news