जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Career News: बारावीनंतर हटके करिअर करायचंय? AI आणि मशिन लर्निंगमध्ये आहेत मोठ्या संधी

Career News: बारावीनंतर हटके करिअर करायचंय? AI आणि मशिन लर्निंगमध्ये आहेत मोठ्या संधी

बारावीनंतर हटके करिअर करण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे.

बारावीनंतर हटके करिअर करण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे.

Career News: बारावीनंतर नेहमीच्या क्षेत्रात न जाता हटके क्षेत्रात करिअर करायचं असेल तर ही मोठी संधी आहे.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर 1 जून : बारावीचा निकाल हा नुकताच लागलाय. बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं हा सर्वच विद्यार्थ्यांपुढं महत्त्वाचा प्रश्न असतो. अभियांत्रिकी, मेडिकल, बँकिंग किंवा वकिली यासारख्या पारंपारिक क्षेत्राकडं विद्यार्थ्यांचा कल हा जास्त असतो. पण, त्याचबरोबर बदलत्या काळाशी सुसंगत कोर्स केल्यानंतरही उत्तम संधी आहेत, हे अनेकांना माहिती नसतं. आज आम्ही तुम्हाला सध्याच्या काळात परवलीचा शब्द बनलेल्या एका कोर्सची माहिती देणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग हे दोन क्षेत्रांबद्दल सध्या बरीच चर्चा केली जाते. मशिनला डेटा सायन्सच्या माध्यमातून एक अल्गोरिदम सेट केला जातो. त्यानंतर आपल्याला कमांड देता येते. त्यानंतर मशिन त्या कमांडनुसार काम करते. रजनीकांत आणि ऐश्वर्या राय-बच्चन हिचा रोबोट हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. त्यामधील प्रत्येक गोष्ट ही रोबोटिक्सच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं शक्य असल्याचं दाखवलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी असून नोकऱ्याही उपलब्ध आहेत. यामधून डेटा सायन्टिस्ट, मशिन लर्निंग इंजिनिअर, रिसर्च सायन्टिस्ट, बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलपर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिगे डेटा इंजिनिअर, रोबोटिक्स सायन्टिस्ट असे वेगवेगळे पर्याय निवडून त्यामध्ये करिअर करता येते. सलाम तिच्या जिद्दीला! घर, नोकरी सांभाळून 38 व्या वर्षी बारावी पास, Video कुठे घेणार प्रवेश? या क्षेत्रात करिअर करण्यासाठी बेंगळुरू, नोएडा, चंदीगड, चेन्नई, हैदराबाद असे महाराष्ट्राबाहेरचे पर्याय आहेत. त्याचबरोबर मागील काही वर्षांपासून राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठांनी या विषयातील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या कोर्सची प्रवेश परीक्षा आणि प्रवेशासंबधीच्या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर वर्षभरात 50 हजारापर्यंत खर्च येऊ शकतो. पण, विद्यार्थी स्कॉलरशिपला पात्र असेल तर तो खर्च सरकारकडून त्याला मिळतो. त्याचबरोबर राज्याच्या बाहेरच्या मोठ्या विद्यापीठातून हा कोर्स करायचा असेल तर त्याला वर्षभरात एक ते दीड लाख रूपयापर्यंतचा खर्च येऊ शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मध्ये करिअर निवडणे म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःचे भविष्य घडवण्यासारखे आहे. जगातील अनेक घडामोडी दररोजच्या जीवनात अनेक टेक्नॉलॉजी या निर्माण होत आहेत. त्याचा डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल एजन्सी हा पाया आहे. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये  या क्षेत्रातील अनेक जागा असून विद्यार्थ्यांना यामधून मोठ्या पगाराची नोकरी मिळू शकते. तसंच ते स्वत:चा व्यवसायही करू शकतात, अशी माहिती या विषयाचे प्राध्यापक रोहन कुर्री यांनी दिलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात