प्रितम पंडीत (सोलापूर), 04 फेब्रुवारी : सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान ही आत्महत्या नसून खून असल्याची घटना समोर आली आहे. अक्कलकोट पोलिसांच्या तपासात हे उघड झाले आहे. 27 वर्षीय महिलेची आत्महत्या नसून खून करण्यात आल्याचे पोलिस तपासामध्ये उघड झाले आहे.
पोलिस रिपोर्टनुसार, भारताबाई या महिलेसोबत आरोपी बाळू माळू याचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान लग्नाला विरोध होत असल्याने प्रियकराने प्रेयसीचा गळफास लावून खून केला आहे. याप्रकरणी बाळू कांतू माळू याला पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपासून भारताबाई व बाळू माळू यांचे प्रेमसंबंध होते.
हे ही वाचा : Krishna Chandgude : आईच्या मृत्यूनंतर मुलानं पाळलं सामाजिक भान, घेतला मोठा निर्णय
दरम्यान, बाळू याचे नात्यातील एका मुलीशी लग्न ठरले होते. या लग्नास भारताबाई यांचा विरोध होता. याचा राग मनात धरून बाळू याने २९ जानेवारी रोजी पहाटेच्या वेळी शेतकरी कल्याणी आळगी यांच्या शेतात भारताबाई यांना बोलावून तिला तिच्याच साडीने कडुलिंबाच्या झाडाला गळफास देऊन खून केल्याचे पोलिस तपासामध्ये पुढे आले आहे.
बीडमध्येही धक्कादायक प्रकार समोर
बीडच्या धारूर पोलीस ठाण्यात शहरातील कृष्णा शेटे वय 34 वर्ष या विवाहित तरुणाने तक्रार दिली, की माझी 19 वर्षीय पत्नी हरवली आहे. तीचा आम्ही शोध घेतला , मात्र आम्हाला ती मिळून आली नाही. त्यामुळे तिचा तपास करावा, अशी फिर्याद पतीने दिली होती. त्यानंतर धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, विजय आटोळे यांनी तपासाला गती देत शोधमोहीम सुरू केली.
हे ही वाचा : आईला सोडायला निघालेल्या संकेतसोबत भयानक घडलं, मित्रही गेला, अख्ख गाव रडलं
यादरम्यान कृष्णा शेटे यांची पत्नी अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळ पिंप्री येथे परळीच्या रोहित लांबूटे या तरुणासोबत सापडली. त्यानंतर पोलिसांनी विवाहितेसह तिच्यासोबत असणाऱ्या रोहित लांबूटेला धारूर पोलीस ठाण्यात आणलं. चौकशी केली असता ती स्वतःहून रोहित लांबूटे याच्यासोबत गेल्याचं तिने सांगितलं.