सोलापूर 19 नोव्हेंबर : चोरीच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. यातील काही घटना घरफोडीच्या असतात, काही घटनांमध्ये कारमधून महागड्या वस्तू किंवा पैसे लंपास केले जातात. तर काही घटनांमध्ये चोर अगदी गर्दीच्या ठिकाणीही हातचालाखी दाखवत चोरी करतात. सध्या अशाच एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना पंढरपूरमध्ये घडली आहे.
mumbai crime : सोन्याची बनावट नाणी विकणाऱ्या गुन्हेगाराचा खून, 2 दिवस अलिशान कारमध्ये होता मृतदेह
पंढरपूरमध्ये हॉटेल जायका जुना कराड नाका येथे एका महिलेनं ही चोरी केली आहे. महिलेनं हॉटेलमध्ये जेवण करताना दुसऱ्या एका ग्राहकाचा मोबाइल चोरल्याची घटना घडली आहे. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून संबंधित महिलेचा शोध सुरू आहे.
पंढरपूर : महिलेनं हॉटेलमध्ये जेवण करताना दुसऱ्या एका ग्राहकाचा मोबाइल चोरल्याची घटना घडली आहे. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून संबंधित महिलेचा शोध सुरू आहे. pic.twitter.com/ukhYYD7n51
— News18Lokmat (@News18lokmat) November 19, 2022
या घटनेत हॉटेलमध्ये दुसरे कस्टमर जेवण करायला आल्यावर एका टेबलवर मोबाईल विसरून गेले होते. यानंतर सदर महिला त्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली. यावेळी तिला कोणाचातरी फोन समोरच्या टेबलवर विसरल्याचं दिसलं. यानंतर महिला आजूबाजूला कोणाचं लक्ष नसल्याचं बघून या टेबलजवळ गेली. यानंतर महिलेनं हा मोबाईल उचलून घेतला.
Online Job Scam : नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, ईडीने गोठवली 80 बँक खाती
महिलेनं हा मोबाईल आपल्या टेबलवर आणला आणि तो आपल्या पर्समध्ये ठेवला. चोरीच्या या घटनेचा व्हिडिओ हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ समोर आला असून संबंधित महिलेची ओळख पटली नसल्याने अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या महिलेचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Theft