सोलापूर, 27 ऑक्टोबर : सध्या ताण-तणावाच्या युगामध्ये आरोग्य लोप पावत चालले आहे. यातच सोलापूर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक 28 वर्षीय युवक वडे तळत असताना अचानक चक्कर येऊन पडला. प्रकाश नानुराम कुमार असे या तरुणाचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरात ही धक्कादायक घटना घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण - माढा शहरातील एक सुप्रसिद्ध राजस्थानी वडापाव सेंटर आहे. याठिकाणी वडापाव करताना 28 वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. माढा शहरातील या वडापाव सेंटरवर 24 ऑक्टोबर रोजी दिवाळीपूर्वी ही घटना घडली. प्रकाश नानुराम कुमार हा तरुण वडे तळत असताना अचानक खाली पडला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
सध्या या युवकाचा चक्कर येऊन पडलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या तरुणाच्या मृत्यू नंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. एकप्रकारे तरुणाईला या दुर्दैवी तरुणाच्या मृत्यूने आरोग्याबाबत काहीतरी धडा घेणे गरजेचे आहे.
वायुप्रदूषणामुळे वाढू शकतो हार्ट अॅटॅकचा धोका; अशी घ्या काळजी गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे वायू, जल आणि ध्वनिप्रदूषणात सातत्यानं वाढ होत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात असल्या, तरी त्याची पातळी वाढतच आहे. वायुप्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. अस्थमा, श्वसनाचे विकार होण्याचं प्रमाण वाढत आहे. हेही वाचा - घरात राहिलेल्या कोरोना रुग्णासोबत धक्कादायक कृत्य; VIDEO पाहूनच होईल संताप वायुप्रदूषणामुळे श्वसनाशी संबंधित विकारांसोबतच हृदयविकार देखील होऊ शकतो. तसंच यामुळे हार्ट अॅटॅकचाही धोका वाढतो, असं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं आहे. लवकरच हिवाळा सुरू होत आहे. या कालावधीत हवेची गुणवत्ता खराब असते. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. परिणामी हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे, असा सल्लादेखील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.