जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / घरात राहिलेल्या कोरोना रुग्णासोबत धक्कादायक कृत्य; VIDEO पाहूनच होईल संताप

घरात राहिलेल्या कोरोना रुग्णासोबत धक्कादायक कृत्य; VIDEO पाहूनच होईल संताप

कोरोना रुग्णाला क्रेनने उचललं.

कोरोना रुग्णाला क्रेनने उचललं.

कोरोना रुग्ण घरात लपून बसताच प्रशासनाने त्याला अशा पद्धतीने बाहेर काढलं.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

बीजिंग, 27 ऑक्टोबर : कोरोनातून सुटका मिळाली की काय असं वाटत असतानाच आता कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. सणासुदीच्या काळात कोरोना फोफावण्याचा धोका लक्षात घेता सरकार, प्रशासनानेही अलर्ट जारी केला आहे. अशात एक धक्कादायक व्हिडीओ  व्हायरल  होतो आहे. कोरोना रुग्णासोबत असं काही केलं जातं आहे की पाहूनच तुम्हाला धक्का बसेल आणि संताप होईल. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना होऊ शकतो. त्यामुळे कोरोना रुग्णांना इतर निरोगी रुग्णांपासून वेगळं केलं जातं. त्यांना घरात किंवा कोव्हिड सेंटरमध्ये आयसोलेट केलं जातं. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत कोरोना रुग्णाला घरातही राहू दिलं नाही आहे. कोरोना रुग्ण घरात राहिला म्हणून त्याच्यासोबत धक्कादायक कृत्य करण्यात आलं आहे. हे वाचा -  कोरोनासारखे व्हायरल इन्फेक्शन रोखण्यासाठी ‘जल नेति’ योग क्रिया प्रभावी, इतरही फायदे घरात लपून बसलेल्या कोरोना रुग्णाला क्रेनने खेचून बाहेर काढण्यात आलं आहे.  व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती क्रेनला लटकताना दिसते आहे. घराच्या छतावरून या व्यक्तीला उचलण्यात आलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

माहितीनुसार क्रेनमध्ये असलेली ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे. ही व्यक्ती घरात लपून बसली होती. या व्यक्तीच्या संपर्कात निरोगी व्यक्ती येऊन त्यांना कोरोना होऊ नये, याची खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं. ही व्यक्ती मुद्दामहून आपल्या घरातून बाहेर येत नव्हती. त्यामुळे प्रशासनाची टीम त्याच्या घरापर्यंत पोहोचली. त्यांनी त्याला जबरदस्ती उचलून नेलं. हे वाचा -  बापरे! कानातून शिट्टी वाजली, नंतर ऐकूच येईना; दिवाळी फटाक्यांमुळे तरुण झाला बहिरा हा व्हिडीओ चीनमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. पण नेमका कोणत्या शहरातील आहे हे माहिती नाही. चीनमधील एका लेखकारने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. कोरोना रुग्णाला क्रेनने आयसोलेशन वॉर्डमध्ये नेलं अशी माहिती त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना पोस्टमध्ये दिली आहे.

जाहिरात

मीडिया रिपोर्टनुसार चीनमध्ये कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागला आहे. प्रकरणं वाढत आहेत. त्यामुळे बऱ्याच शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं जातं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात