जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pandhapur Vitthal Mandir : गरिबांच्या देवाला सोन्याचा हार, विठुरायाच्या चरणी 11 लाखांचा चंदनहार अर्पण, VIDEO

Pandhapur Vitthal Mandir : गरिबांच्या देवाला सोन्याचा हार, विठुरायाच्या चरणी 11 लाखांचा चंदनहार अर्पण, VIDEO

Pandhapur Vitthal Mandir : गरिबांच्या देवाला सोन्याचा हार, विठुरायाच्या चरणी 11 लाखांचा चंदनहार अर्पण, VIDEO

कार्तिकी पोर्णिमेनिमीत्त पंढरपुरात जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान विठुरायाला भेटण्यासाठी लाखो भाविक गर्दी करत आहेत.

  • -MIN READ Pandharpur,Solapur,Maharashtra
  • Last Updated :

विरेंद्र उत्पाल, (पंढरपूर), 02 नोव्हेंबर : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या कार्तिकी पोर्णिमेनिमीत्त पंढरपुरात जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान विठुरायाला भेटण्यासाठी लाखो भाविक गर्दी करत आहेत. अशातच एका भाविकाने विठ्ठलाच्या चरणी तब्बल 11 लाखांचा सोन्याचा चंदनहार अर्पण केला आहे. यामुळे कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने  विठुरायाच्या खजिन्यात विविध सोने चांदीच्या दागिन्यांची भर पडली आहे. कल्याण येथील विठ्ठल भक्त वंदना म्हात्रे यांनी 11 लाख रुपये किंमतीचा 19 तोळे वजनाचा सोन्याचा चंदनहार‌ विठुरायाला अर्पण केला आहे.

जाहिरात

दरम्यान कार्तिकी यात्रेनिमीत्त लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनाला येत आहेत. यामुळे भाविक मनोभावे विठ्ठलाच्या चरणी दान अर्पण करत आहेत. कल्याणमधील कल्याण येथील विठ्ठल भक्त वंदना म्हात्रे यांनी 11 लाख रुपये किंमतीचा 19 तोळे वजनाचा सोन्याचा चंदनहार‌ विठुरायाला अर्पण केला आहे.

हे ही वाचा :  नोव्हेंबर महिन्यातील सर्व सण-उपवासांची ही पहा यादी, वर्षातील शेवटचे चंद्रगहण पण आहे

अत्यंत सुबक कलाकुसर असलेला सोन्याचा चंदन हार आज मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे सुपूर्द केला. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या देणग्यांमध्ये चांगली वाढ झाली आहे.

शिर्डीच्या साईबाबांनाही सोन्याचा हार अर्पण

जाहिरात

साईबाबांच्या दरबारी सोने - चांदी दानस्वरुपात येणं आता नवीन काही राहील नाही. मात्र हैद्राबाद मधील एका महिला साईभक्तानं सोन्याचं अनोख दान बाबांना देवू केल आहे. पोलावर्नम कल्याणी या महिला भाविकाने आपल मंगळसूत्रातील सोन्यापासून सुवर्णहार करून बाबांना अर्पण केला आहे.

हे ही वाचा : तुळशीच्या लग्नाला काय काय लागतं? तुळशी विवाह पूजा सामग्री यादी इथं पाहा

जाहिरात

वरिष्ठ आयएएस पतिच्या निधनानंतर स्त्रीधन बाबांच्या चरणी अर्पण करत सुवर्णहार स्वरुपात बाबांच्या चरणी दान दिला आहे. साईसंस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सुवर्ण हार स्विकारला असून मध्यान्ह आरती नंतर बाबांच्या मुर्तीला चढवण्यात आला आहे.

साईंच्या दरबारी एक रुपयांपासून ते सव्वाशे कोटी रुपयांच दान बाबांच्या झोळीत टाकणारे भाविक येत असतात. साई समाधीचं दर्शन घेवून आपल्या इच्छाशक्ती नुसार बाबांना दान देतात. अलिकडच्या काळात बाबांना सोन्याच दान देणाऱ्या भाविकांची संख्या वाढताना दिसते.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात