प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर, 10 जून : लग्न पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी जाणाऱ्या नवरदेवासह दोन मित्रांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू (groom died in road accident) झाल्याची हृदयद्रावक घटना सोलापुरातून समोर आली आहे. तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट (Akkalkot) येथे लग्न पत्रिका (Marriage invitation cards) देवासमोर ठेवण्यासाठी जाणाऱ्या नवरदेवासह दोन मित्रांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. अक्कलकोट ते गाणगापूर जाणारे रोडवर बुधवारी रात्री पावणे अकरा वाजता शक्करपीर दर्गाजवळ भीषण अपघात झाला. कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दीपक बुचडे (वय 29), आकाश ज्ञानेश्वर साखरे (वय 28), आशुतोष संतोष माने (वय 23) (रा. हिंजवडी पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. वाचा : तिकीट विक्रीच्या वेळी जोरदार गोंधळ,महिलांमध्ये मारामारी, पोलिसांनी केला लाठीमार VIDEO 18 जून रोजी दीपक याचा विवाह होणार होता. त्या विवाहाची पत्रिका तुळजापूर, गाणगापूर आणि अक्कलकोट येथील देवदर्शनासाठी आणि पत्रिका ठेवण्यासाठी दीपक आपल्या मित्रांसह अक्कलकोटहून गाणगापूरच्या दिशेने निघाला होता. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकने दीपक याच्या कारला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात कारमध्ये असणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. लग्नकार्य अवघ्या काही दिवसांवर असताना, असा अपघाती मृत्यू झाल्यानं संपूर्ण हिंजवडी परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. बेळगावात लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला लग्नाला निघालेल्या वऱ्हाड्यांच्या गाडीला काही दिवसांपूर्वी बेळगावात भीषण अपघात झाला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात चौघांचा मृत्यू झाला. बेळगावहून निप्पाणीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने वऱ्हाड्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतकांमध्ये नवरी मुलीचा भाऊ, काका, काकू आणि आजी यांचा समावेश आहे. या अपघातात इतर प्रवासी जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्वजण निपाणी तालुक्यातील बोरगाववाडी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.