मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

MIM सोबत राष्ट्रवादीची दिलजमाई! सोलापुरातील नव्या समीकरणाकडे नागरिकांचं लक्ष

MIM सोबत राष्ट्रवादीची दिलजमाई! सोलापुरातील नव्या समीकरणाकडे नागरिकांचं लक्ष

MIM सोबत राष्ट्रवादीची दिलजमाई! नव्या समीकरणाकडे नागरिकांचं लक्ष

MIM सोबत राष्ट्रवादीची दिलजमाई! नव्या समीकरणाकडे नागरिकांचं लक्ष

सोलापुरात एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची दिलजमाई झाल्याचं चित्र आहे.

    प्रितम पंडित, सोलापूर, 11 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून आपण वारंवार वेगवेगळे राजकीय समीकरण पाहतोय. राज्यात अडीच वर्षांपूर्वी स्थापन झालेलं महाविकास आघाडीचं सरकार हे देखील एक नवं राजकीय समीकरण होतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन वेगवेगळ्या विचारसरणी आणि भूमिकांचे पक्ष एकत्र आले होते. त्यानंतर दीड महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात वेगळं राजकीय समीकरण बघायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी केली आणि भाजपची साथ धरली. त्यामुळे महाराष्ट्राच्या नागरिकांपुढे आणखी एक वेगळं समीकरण तयार झालं. राजकारणातील असंच काहीसं वेगळं समीकरणं आता राज्यपातळी पाठोपाठ स्थानिक पातळीवर देखील निर्माण होताना दिसत आहे. कारण सोलापुरात तशीच काहिशी घटना घडली आहे. सोलापुरात एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची दिलजमाई झाल्याचं चित्र आहे. या दिलजमाईने एमआयएम पक्षाला मोठा झटका बसला आहे. कारण पक्षाच्या सात नगरसेवकांनी औवेसींची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती घेण्याचं ठरवलं आहे. राज्यात पुढच्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोलापुरात त्याचाच प्रत्यय येतोय. विशेष म्हणजे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वत:च्या पक्षाला बळकट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामध्ये ते काहीसे यशस्वी होताना दिसत आहेत. कारण त्यांनी एमआयएम पक्षाला मोठं खिंडार पाडलं आहे. (धन्युष्यबाणाची लढाई, उद्धव ठाकरेंना धक्का, निवडणूक आयोगाने दिली 'डेडलाईन') सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरात एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तोफिक शेख हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तोफिक शेख यांच्यासह एमआयएम पक्षाचे सहा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एमआयएम पक्षाला सोलापुरात मोठे खिंडार पडल्याचे चित्र दिसत आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रवेश घेतला आहे. 2017 साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन एमआयएम पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष तोफिक शेख यांनी 9 नगरसेवक निवडून आणले होते. दरम्यान विजापूर येथील कॉंग्रेस महिला पदाधिकाऱ्याच्या खुनाच्या आरोपात तोफीक शेख हे कारागृहात होते. याशिवाय सोलापूर शहरात तोफिक शेख यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्हे दाखल असलेल्या शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रवेश दिला जाणार आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: MIM, NCP, Solapur, ओवेसी MIM

    पुढील बातम्या